Tag: Marathi Baal-geet

  • श्याम सुंदर सावळा – SHYAAM SUNDAR SAAVALAA (beautiful lord Krishna)

    माळ गुंफण्या पोवळा घर बनविण्या ठोकळा खाण्यासाठी ढोकळा घाऱ्या करण्या भोपळा खीरीसाठी कोहळा तुरट आंबट आवळा गोड मोर-आवळा बाळ मनाचा मोकळा श्याम सुंदर सावळा

  • नाताळ – NAATAAL (Christmas)

    येणार नाताळ नाताळ सुंदर झालंय आभाळ देऊया भेटी नाजूक नाती जपण्य़ा साजूक नाताळबाबाशी बोलूया मजेत गाणी गाऊया

  • एक करंजी – EKA KARANJEE (diwali sweets)

    एक करंजी खूपच रुसली कढईमध्ये बघ धडपडली चिडून कढई तिथून उठली चुलीवरी अन जाऊन बसली कढई मग तेलाने भरली फूंक मारिता चूल पेटली तेलालाही उकळी फुटली ताप तापुनी उकळ उकळली शुभ्र करंजी तयात फुगली बघून झारा खुदकन हसली थाळीमधल्या जळात पडली मासोळीसम त्यात पोहली बाळोबाने तिला उचलली चोखुन चावुन गिळुन टाकली

  • सोलकढी – SOLKADHEE (coconut kokum curry)

    आवडते मज सोलकढी तूप कढविते लोणकढी जिरेभात दही साळीचा घावन डोसा जाळीचा मऊ हुदळगी आंबोळी हुरण होळगी वा पोळी झुणका भाकर ज्वारीची खास ढोकळी डाळीची अंगत पंगत बसवूया सोलकढी त्या वाढूया

  • अंकांचे गाणे – ANKAANCHE GAANE (song of digits)

    In this Marathi poem the poetess asks us all to overcome superstitions and blind beliefs. एक दोन तीन चार बुवाबाजी हद्दपार पाच सहा सात आठ श्रद्धा म्हणजे नाही गाठ नऊ दहा अकरा बारा उघडा खिडक्या येण्या वारा तेरा चौदा पंधरा सोळा अहंपणाला शिकवा शाळा सतरा अठरा एकोणीस वीस भयगंडाचा पाडा कीस एकवीस बावीस तेवीस चोवीस…

  • बुदू बुदु – BUDOO BUDOO (fast fast)

    काय कशाला कुठे कसे ? पुसू नको तू प्रश्न असे! हवे तुला जर उत्तर रे, कशास अर्धे प्रश्न बरे? पूर्ण वाक्य तू जुळव बघू; हसेल उत्तर खुदु खुदु! मिटतिल शंका बुदू बुदु…

  • पावश्या घूम – PAVASHYA (brainfeverbird)

    घूम घूम पावश्या चारा देती मावश्या चारा आहे मऊ पाऊस तुझा भाऊ ये रे ये रे भावा भाषा शीक जावा भाऊ शिकला भाषा पणजा गुंडाळी गाषा…