Tag: Marathi Bhaktigeet

  • जिन प्रिय ब्रम्हा ईश खुदा तू – JIN PRIY BRAMHAA EESH KHUDAA TOO

    जिन प्रिय ब्रम्हा ईश खुदा तू हृदयी अमुच्या रहा सदा तू… नसे मागणे तुजला काही कार्य करू सरसावून बाही दिशा मोकळ्या आम्हा दाही नीर तेज नभ पवन मृदा तू … बदल घडावे घडण्यासाठी चैतन्याला जपण्यासाठी आनंदाने जगण्यासाठी नाविन्याची सजग अदा तू… दगडामधुनी खोदू लेणी शुभ्र फुलांची गुंफू वेणी पुरे जाहली देणीघेणी लढण्यासाठी उचल गदा तू……

  • कातरवेळी – KAATARVELEE

    अचूक कैश्या घटिका मोजू अंधुक धूसर कातरवेळी दिवा लाविता ज्योतीवरती पतंग जळती कातरवेळी बोलायाचे ऐकायाचे बरेच जे जे राहुन गेले आठवुनी तुज तेच बोलते तुला ऐकते कातरवेळी जिथे जिथे मी तुला भेटले नजरेमधले गूढ वाचले अश्या जळिस्थळी शांत तरुतळी फिरून येते कातरवेळी मौनामधले प्रश्न बोलके अधरावरती गोळा होता गाते भजने स्तोत्र आरत्या देवापुढती कातरवेळी हृदयावरती…

  • अमीर – AMEER

    मम हृदयी तू भगवंता होना आता स्थीर अंतर्यामी वाहूदे शुद्ध भक्तिचे नीर क्षीरोदधिच्या स्नानाने धवल होउदे धीर तूच औषधी आतारे मिटवाया मम पीर तप करुनी मी ज्ञानार्थी सोडत आहे तीर झेलायाला उभे इथे कषाय त्यागुन वीर चरू म्हणूनी मी अर्पे शब्दफुलांची खीर तीर्थंकर हे नाम तुझे पायाशी तसवीर हस्त जोडुनी ठेवावी घडीव सुंदर चीर पंचइंद्रिये…

  • पंचप्राण मम जाहले – PANCHAPRAAN MAM JAAHALE

    पंचप्राण मम जाहले, पंचभुतांवर स्वार। जिनवाणीला प्राशुनी, करेन हा भवपार। विषय वासना भावना, छळोन मजला फार। धरेन भगवन मस्तकी, शुद्ध भक्तिची धार। खरेपणाचे शस्त्र हे, परजिन त्याची धार। मिथ्यात्वावर घातकी, चालवेन तलवार। हृदय मंदिरी मूर्त ही, गळ्यात मौक्तिक हार। स्वागत करण्या प्रीतिचे, सदैव उघडे दार। मात्रावृत्त (१३+११= २४ मात्रा)

  • जिनवाणी – JINVAANI

    In this poem the poetess says, Jinvaani is our mother. गर्जा जयजयकार जिनांचा गर्जा जयजयकार क्षमा धर्म हे भूषण अमुचे त्यागू क्रोधास त्याग तपाची परंपरा ही आगम धर्मात हृदय शुचिता शुभ्र जलासम मनात खळखळणार जिनवाणी ही माय आमुची धर्मामृत पाजे तिच्या तनूवर मार्दव आर्जव अलंकार साजे माय शारदा गुरूमुखातून अखंड झरझरणार भूल न पाडिती अम्हास…

  • गोमटेश स्तुती – GOMATESH STUTEE

    This poem is a translation of original poem written by Aachaary Nemichandra Sidhddant Chakravartee(आचार्य नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती). Aachaary wrote this Stutee in Praakrut language(गोमटेश स्तुती -विसट्ट कंदोट्ट दलाणु यारं ). गोमटेश स्तुती -विसट्ट कंदोट्ट दलाणु यारं आचार्य नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती यांच्या मूळ प्राकृत स्तुतीचा मराठी भावानुवाद नेत्र जयाचे जणू भासती सरोवरातिल कमलदले मुखचंद्राची शोभा ऐसी…

  • तीर्थंकर बाळासम – TIRTHANKAR BAALAASAM

    In this  poem the poetess says, ‘Jin-bimb is a symbol of pure soul. Tirthankars have pure soul. No other person is as beautiful as Tirthankar(तीर्थंकर).’ तीर्थंकर बाळासम  सुंदर कुणी न तिन्ही जगती जिनबिंबाचे  दर्शन घेण्या अधीर जन सुरपती रूप मनोहर तीन छत्रयुत आम्रतरूच्या तळी झळाळणारी सुवर्णकांती पद्मे चरणा तली चौसठ चवऱ्या निसर्गकन्या भवताली ढाळती वाणी शीतल…