-
जिन प्रिय ब्रम्हा ईश खुदा तू – JIN PRIY BRAMHAA EESH KHUDAA TOO
जिन प्रिय ब्रम्हा ईश खुदा तू हृदयी अमुच्या रहा सदा तू… नसे मागणे तुजला काही कार्य करू सरसावून बाही दिशा मोकळ्या आम्हा दाही नीर तेज नभ पवन मृदा तू … बदल घडावे घडण्यासाठी चैतन्याला जपण्यासाठी आनंदाने जगण्यासाठी नाविन्याची सजग अदा तू… दगडामधुनी खोदू लेणी शुभ्र फुलांची गुंफू वेणी पुरे जाहली देणीघेणी लढण्यासाठी उचल गदा तू……
-
माग – MAAG
स्वप्न पाहिले होते तेंव्हा फक्त तुझेकी त्यांचेही या प्रश्नांचा माग काढण्या अजूनही बघ गाते मी भेटी अपुल्या त्या तेंव्हाच्या दर्पणातल्या प्रीतीच्या क्षण अनुभवण्या हुरहुरणारे मागे मागे जाते मी शांत तडागाच्या काठावर बसुन पाहता प्रतिबिम्बा बिंबामधली अनंत रूपे तुझीच बघुनी खुलते मी जे जे माझे ते सर्वांचे वेगवेगळे ना काही सुटता गुंता उजळुन जाते तुझे नि…
-
कातरवेळी – KAATARVELEE
अचूक कैश्या घटिका मोजू अंधुक धूसर कातरवेळी दिवा लाविता ज्योतीवरती पतंग जळती कातरवेळी बोलायाचे ऐकायाचे बरेच जे जे राहुन गेले आठवुनी तुज तेच बोलते तुला ऐकते कातरवेळी जिथे जिथे मी तुला भेटले नजरेमधले गूढ वाचले अश्या जळिस्थळी शांत तरुतळी फिरून येते कातरवेळी मौनामधले प्रश्न बोलके अधरावरती गोळा होता गाते भजने स्तोत्र आरत्या देवापुढती कातरवेळी हृदयावरती…
-
जाण – JAAN
कर्तव्याचे भान असूदे हक्क मागताना खरेपणाची जाण दिसूदे भाव तोलताना स्याद्वादाची दृष्टी असूदे अर्थ लावताना व्यवहारातिल चोखपणाला व्यवहाराने जाणा व्यवहारातिल निश्चय जपण्या ताठ असावा बाणा ताठ असावा कणा बुद्धिचा परी नच ताठर रे ममतेच्या पातीची त्यावर घालू पाखर रे लेखणीची वा तलवारीची जात इमानी खरी जीवातिल चैतन्य टिपाया लढते धरेवरी लढता लढता पडेल अथवा मरेल…
-
निखार – NIKHAAR
ठिणगी पडण्या गार घासुया गारेवरती निखार फुलण्या फुंकर घालू जाळावरती वात टिकाया वात वळूया हातावरती ज्योत तेवण्या ओंजळ धरुया समईवरती फूल जपाया देह तोलुया काट्यावरती प्रेम जिंकण्या शौच धरूया सत्यावरती राध उजळण्या कषाय जाळू अग्नीवरती मात्रावृत्त(८+८+८=२४ मात्रा)
-
गीत – GEET
गीत गावे लिहिता लिहिता ते रचावे गाता गाता भाव भरण्या त्यात सुंदर पांघरावे नील अंबर अंबरातिल मेघ झरता ते रचावे गाता गाता अर्थ तो जाणून घ्यावा गोड ही मानून घ्यावा पाहण्याला त्यात आत्मा ते रचावे गाता गाता गीत गावे लिहिता लिहिता ते रचावे गाता गाता
-
भ्रमर भृंग – BHRAMAR BHRUNGA
In this poem the poetess asks her beloved person to realize power of true love and emotions expressing true love. भ्रमर भृंग काय म्हणू तूच सांग नाथा हृदयातिल मधु बोले सोड भांग नाथा थकलेरे पाहुनिया नित्य नवे चाळे रिक्त पुन्हा जाहलेत नयनांचे गाळे केकारव नको अता हवी बांग नाथा निशीगंध मुग्ध धुंद प्रीतीची गाणी शब्द निळे…