-
गर्वाचे घर – GARVAACHE GHAR
गर्वाचे घर कर्दमि रुतले मम प्राणावर तू नभ धरले अतिव सुखाने हृदय स्पंदले धुके हळुहळू विरले खिरले निर्भय निर्भय अभय जाहले मी प्रेमाने विश्व जिंकले पूर्ण प्रीतीचे गीत प्रकटले लेखणीतुनी माझ्या झरले ‘मी’ पण माझे मला भावले लिहून गझला पुरून उरले मात्रा १६…
-
जादुई हृदय परी – JAADUI HRUDAY PARI
हृदयामधली परी जादुई नित्य मला सांगते मला हवे ते घडेल म्हणते मधुर मधुर गाते माझ्या काव्यामधली शक्ती जगास अवघ्या कळली म्हणून केवळ पुण्ये माझी ओंजळीत फळली प्रियजन माझे सदा सर्वदा होतील आनंदी रक्षाया जीवाला त्यांच्या मीच जादुई कांडी मैत्री माझी शुद्ध जिवांशी मी उर्जा स्तोत्र हवे हवे ते मिळवाया मी प्राणवायुचा झोत गर्वाने ज्या मूढ…
-
रसिका – RASIKAA
मी रंगांचे लिहिले गाणे मम गाण्यावर कोण दिवाणे ठाऊक मजला कोण दिवाणे त्यांच्यासाठी लिहिन तराणे पुरे जाहले अता बहाणे पुरे पुरे चोरून पहाणे विणू प्रीतीचे ताणेबाणे कशास व्हावे अतीशहाणे शीक पुन्हा तू भरुन वहाणे मिळून रसिका गाऊ गाणे
-
पाखर – PAAKHAR
कधी लिहावे एकच गाणे कधि पाडावा पाऊस त्यांचा धारांतिल वेचुनिया गारा उतरवुया हातांचा पारा चेहऱ्यावर तळव्यांना फ़िरवुन गुलकंदी गालांना खुलवुन झरता अश्रू झरझर गाली शाल पांघरुन पाठीवरती फूलपाखरी पाखर घालू
-
दर्जी – DARJI
आज अचानक आवडता मज दिसला डस्टर शोधत असता मोबाईलचा दडला चार्जर सदैव तत्पर धूळ पुसाया डस्टर माझा धावुन येतो पिळे पिळाया ड्रायर माझा डस्टर चार्जर ड्रायर तत्पर काम कराया असुन साधने श्रमते अजुनी घाम गळाया कुशल दर्जी जरि झगे उसवुनी अल्टर करते शुभ्र झग्याचे कृष्ण मळवुनी अस्तर करते शाळेतच डांबाया तस्कर जाळे लाविन सही कराया…
-
शिरोमणि – SHIROMANI
जळात मी मन मंदिर माझे रेखांकित केले लहरींवरती तरंगणारे उभे शिल्प केले शांत पीत जल लाटांवरती हरित नील धरती पंच शिखरयुत राउळातल्या घंटा झांजरती अवती भवतीचे मोक्षार्थी नर नारी सुंदर नीर नदीचे संथ वाहते त्यात झुले अंबर देउळ की हे जहाज अपुले शिखर कळस हृदया तीर्थंकर चोवीस शिरोमणि बेल पळस हृदया
-
घड्याळ अंबर – GHADYAL AMBAR
चोविस ताशी घड्याळ अंबर मला दावते जिन तीर्थंकर शून्य प्रहर रात्रीचे बारा लख्ख झळकतो तारा तारा वृषभनाथ तीर्थंकर पहिले एक वाजता मजला दिसले अजितनाथ तीर्थंकर दुसरे दोन वाजता सुनेत्र हसरे संभव जिन तीर्थंकर तीज तीन वाजता लखलखे वीज अभिनंदन जिन चवथे भगवन चार वाजता त्यांचे दर्शन पंचम तीर्थंकर सुमती जिन पाच वाजले हृदयी किणकिण पद्मप्रभू…