-
तुझ्याआधी – TUZYAA AADHEE
तुझ्याआधी घरी माझ्या पाऊस आला कुणासाठी घरी माझ्या पाऊस आला चिंब काया मोहराया रिंगण धराया चंद्रमौळी घरी माझ्या पाऊस आला अंतरीचे बोल बोली ऐकून टिपण्या देत हाळी घरी माझ्या पाऊस आला झरे ओढे वाहताती संगीत देण्या भरत पाणी घरी माझ्या पाऊस आला तावदाने वाजवूनी डोकावत हळू म्हणत गाणी घरी माझ्या पाऊस आला सुनेत्राला भेटावया इथे…
-
प्रभात होते – PRABHAAT HOTE
प्रभात होते निशा व्हावया रंगांतर केले प्रभातीस मी ब्यळग म्हणोनी भाषांतर केले बकुळीने निशिगंध प्राशुनी गंधांतर केले न्यूनगंड सोडून मनातिल गंडांतर केले देह सजविण्या सुडौल माझा वस्त्रे मी ल्याले नाटकातले पात्र बनाया वेषांतर केले भावभावना सुरभित कोमल शब्दांकित करुनी गुजगोष्टींचे फुलांत सुंदर रूपांतर केले वेगवेगळे स्वभाव कळण्या सृष्टी धरणीचे कधी जलातुन आकाशातुन देशांतर केले नजरशरांनी…
-
तांबड – TAAMBAD
पूर्व दिशेला तांबड फुटता तप्त जाहले रक्तिम्यात त्या बुडून जाता रिक्त जाहले पहिल्या धारेच्या गझलेने तृप्त जाहले चवीचवीने तिला प्राशिता मुक्त जाहले पहाटवारे टपले होते बोल टिपाया चुंबून त्याला कषाय माझे गुप्त जाहले भावभावना सांडत होत्या पापण्यांतुनी शिस्त लावण्यासाठी त्यांना सक्त जाहले चोर लुटारू लुटण्या येता तुला ‘सुनेत्रा’ अवगुण उघडे गुण सारे मम सुप्त जाहले…
-
छळवादी – CHAALHAVAADEE
छळवादी रिपु पूर्ण जळूदे शुद्ध जलाने हृदय भरूदे मनात किंतू कुणाच्याच ना हीच अवस्था खरी टिकूदे माझ्याही अधरातुन झरझर तुझ्या गझलमाला बरसूदे चंचल हरिणी शांत रागिणी तिच्या उरी संगीत झरूदे तुडुंब विहिरी जोहड धरणे तळी जलाशय तृप्त असूदे गाठवलेले गोठवलेले मणी मोकळे घन वितळूदे मित्र मैत्रिणींसंगे निर्भर मुक्त ‘सुनेत्रा’ ला विहरूदे मात्रावृत्त(१६ मात्रा)
-
सुरस खरी – SURAS KHAREE
जमेल तेव्हा ये सवडीने गोष्ट ऐकण्या सुरस खरी रसिक जनांना मनभावन पण तुझ्यासाठी ती कुरस खरी नकोच तोरा मिरची पुढती तीच तिखट अन सरस खरी नकोस गर्जू ओठ फाकुनी नेत्रांमधुनी बरस खरी एक फूलही सुगंध भरले पुरे त्यांचिया साक्षीला हव्या कशाला भेटी वस्तू प्रेमासाठी तरस खरी नकोच स्पर्धा नको परीक्षा नजर भिडव नजरेला तू तुझ्या…
-
छत्री – CHHATREE
छत्री घेउन निळी निळी फिरायचे मी जळी स्थळी पाऊस धार ये धो धो तुडुंब भरण्या धरण तळी कडेकपारी या धुंडू खळखळणाऱ्या शुभ्र घळी पानापानांवरी हसे प्राजक्ताची कळी कळी श्रावण बरसे रंगसरी इंद्रधनूला मार हळी मात्रावृत्त(१४ मात्रा)
-
यमाई – YAMAAEE
नजरेमध्ये प्रेम असूदे विषय कशाला वयात अन्तर अंतरात मग प्रणय कशाला भाव भावना भरून वाहे कुठे वास ना वसन लपेटू दहा दिशांचे प्रलय कशाला स्वभाव अपुला जपेल ‘मी’ रे नको काळजी कधी उसळ अन उर्मट हो तू विनय कशाला मला न भीती अपघाताची अन मरणाची मीच यमाई तुझ्याकडुन मज अभय कशाला अचूक समयी समई विझते…