-
अकारादीक्षरा – AKAARAADEEKSHARAA
अरण्य भरले फळाफुलांनी वारा वाहे अः अः आठवणीतिल तळ्यात नावा तरंगणाऱ्या पहा पहा इमारतीतिल कैक सदनिका कैक उघडल्या रः रः ईश्वर केवलज्ञानी ब्रम्हा दिशादिशातुन दहा दहा उग्र तपाने प्राप्त मुनींना ऋद्धी सिद्धी मः मः ऊर्ध्वगति जीवास घेऊनी… चिंब पावसी नहा नहा ऋजुगति ऋजुमति सरळ सरल जे जाणायाला वः वः लृकार अक्षर सुवर्णकांती विघ्नविनाशक मः मः…
-
बोलावे – BOLAAVE
-
फुलवाली – FUL VAALEE (female florist)
फुलवाली का मूक जाहली बुके बांधुनी झाडांवरचे गुलाब मौनी मुके बांधुनी दाट धुक्यातिल दिसतिल वाटा सूर्य उगवता कसे ठेवशिल निळे पारवे धुके बांधुनी पूल बांधण्या नदीवरी तू पसर ओंडके नकोस ठेवू ओले ते वा सुके बांधुनी नाजुक माझ्या हृदयामध्ये गझलेमध्ये खरेच का मी मुला फुलांना चुके बांधुनी अंबरातल्या अन भूवरल्या साऱ्या चंचल नक्षत्रांना मी तारा…
-
गोम्मट हाऊस – GOMMAT HOUSE
गोम्मट व्हिल्यावर घन झुकला पाण्याने भरल्यावर झुकला रंग पारवा निळसर ज्याचा असा जिना वळणावर झुकला वेल कळ्यांनी लदबदली अन शुभ्र फुलांचा मांडव झुकला भित्तीचित्रे कलापूर्ण ही पहा त्यातला मानव झुकला जलाशयावर बरसायाला रंग भरूनी श्रावण झुकला गोम्मट हाऊस मधुन कटता व्यंतर कपटी ! नागर झुकला गोम्मट हाऊस मधले प्रेम पाहुन ओला मोसम झुकला जेते इथले…
-
ओढा – ODHAA (natural water stream)
-
छत – CHHAT (roof)
रंगबिरंगी छत्र्यांचे छत वाटेवरती रांग दिव्यांची आहे तेवत वाटेवरती पदपथ इतुका मस्त भोवती फुले वाटिका ज्येष्ठातिल सर आहे नाचत वाटेवरती शालीसम घन मृदुल मुलायम हिरवळीवरी थेंब दवाचे फुलले शत शत वाटेवरती टेबलखुर्च्यांवरी बसूनी घेऊ कॉफी गप्पाटप्पा करता पाहत वाटेवरती लाल गुलाबी हिरवे पिवळे निळे जांभळे रंग मनातिल खुलतिल बरसत वाटेवरती गझल मात्रावृत्त (मात्रा २४)
-
काटा – KAATAA (thorn)
प्रियतम झारा आत्मा सुंदर प्रियतम काटा आत्मा सुंदर प्रियतम माझा आत्मा सुंदर प्रियतम झाला आत्मा सुंदर काळ्या जलदांमधुनी चमके प्रियतम तारा आत्मा सुंदर लहर सुगंधित बनुनी येतो प्रियतम वारा आत्मा सुंदर नृत्य विजेचे बघत बरसते प्रियतम धारा आत्मा सुंदर घट मातीचा बीज तयातिल प्रियतम साधा आत्मा सुंदर माय यशोदेची जिवलग ती प्रियतम राधा आत्मा सुंदर…