-
ईद – EID (fetival of muslim community)
चंद्र पाहिला अंबरात अन हृदयात उमटली ईद निळ्या समुद्री उधाणले जल हृदयात उमटली ईद गुलाब काही मनातले मी वहीत ठेवून जपले वही उघडता आज अचानक हृदयात उमटली ईद जुनी डायरी त्यातिल नावे कुठे हरवली आहेत पुस्तकात ती बसता शोधत हृदयात उमटली ईद चंद्रकोर नाजुक झुलणारी नाविक मी जणु नावेत भवती मासे फिरता सळसळ हृदयात उमटली…
-
वेल – VEL (vine)
वाटेवरले टाळत धोंडे वेल कपारीवरी जिजीविषेने वर वर चढते वेल कपारीवरी चढता चढता पुढे लागता संगमरवरी घाट जगण्यासाठी खाली उतरे वेल कपारीवरी वेल न म्हणते मी तर नाजुक कशी कळ्यांना जपू मूक कळ्यांचा भार वाहते वेल कपारीवरी प्रकाश माती हवेत राहुन पाणी शोषायास हवे तेवढे वळसे घेते वेल कपारीवरी ऋतू फुलांचा वसंत येता बहरून सळसळुनी…
-
चैत्यालय – CHAITYAALAY
काळी काळी, काष्ठे शिसवी, रचून न्यारा, बनला अपुला, एक बंगलो, स्वतःत रमण्या… अनुपम चैत्यालय मनमंदिर, मूर्त पाहुनी, तीर्थंकर भक्तीत झिंगलो, स्वतःत रमण्या…. भक्तामर स्तोत्रातिल कडवी, अठ्ठेचाळिस, भक्तांसम कंठस्थ व्हावया,भक्ती केली… दर्शन केले, पूजन केले, जिनदेवाचे, गुणानुरागी होत खंगलो, स्वतःत रमण्या…. धुवांधार पावसात न्हाउन, उभी रिंगणे, गोल रिंगणे, करून नाचत चिंब जाहलो… वारीमध्ये, अभंग ओव्या म्हणता…
-
पुणे – PUNE
सिटी पुणे जसे तसे असेन मस्त स्मार्ट मी सिटीत पिंपवड जसे जगेन मस्त स्मार्ट मी सिटीत पिंपवडमधे सुजाण माणसे खरी तयातले कवीगुणी स्मरेन मस्त स्मार्ट मी वरून पिंपरी जरी जहाल खूप वाटते तिच्यामधील मार्दवा जपेन मस्त स्मार्ट मी सचैल चिंचवड पुरे भिजून चिंब पावसी तसेच पावसात या लिहेन मस्त स्मार्ट मी जलात नाच नाचती मयुर…
-
भीजपाऊस – BHEEJ PAAOOS (steady gentle rain, drizzle)
भीजपावसा अता भिजव मृत्तिका गावयास सावळी तलम मृत्तिका मृत्तिकेस बावऱ्या रंग लाव तू रंगल्यावरी घटास भरव मृत्तिका दाटल्या नभापरी वस्त्र जांभळे नेसवून घाटदार घडव मृत्तिका डौलदार चालते वीज प्राशुनी वाटते जणू सुरा सजल मृत्तिका गझल गात शिंपते चांदणे जळी वाहतेय सुंदरा तरल मृत्तिका गझल अक्षरगणवृत्त (मात्रा १९) लगावली – गालगालगालगा/गालगालगा/
-
भृंग – BHRUNG
-
स्वीकार – Acceptance
अक्षरातल्या कळ मंत्रांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या वारीच्या घाटात सुरांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या पुष्पपऱ्यांच्या हुंकारांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या अत्तरदर्दी व्यापारांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या मालवल्यावर समया साती देवघरातिल वेदीवरच्या खोल जलातिल अंधारांनी कथा फुलांच्या उमटत गेल्या मंदिरातुनी निनादणारा मधुर नाद घंटेचा ऐकत णमोकारमय अक्षरातुनी कथा फुलांच्या उमटत गेल्या शशधर उगवे बीजेचा अन ओवाळाया…