-
सांजरम्य गझला – SANJ-RAMYA GAZALA
सांजरम्य गझला माझ्या पुन्हा पुन्हा वाच वाचण्यास मिटल्या नेत्रा उघड एकदाच पहा नीट बिंबा तुझिया लोचनात दोन सांडुदेत अश्रू होतो पापण्यांस जाच टाळशील भेटीगाठी किती काळ सांग खरेखुरे सांगायाला हवी काय लाच मधुर मधुर बोलायाला चांदण्यात न्हात अंबरात चंद्रालाही म्हणूयात नाच पावसास पाडायाला आतुरले मेघ गोष्ट नवी कोरी लिहिण्या ओंजळीत साच शब्द निळे लहरत येता…
-
आषाढ अधिक – ASHADH ADHIK
पाऊस उखळात कांडे धो धो आषाढ अधिकात नाचे धो धो फुसांडे वेगात गर्जत उसळत नदी पावसाळी वाहे धो धो प्रपाता ओतीत जलास घुसळत पाऊस धबाबा सांडे धो धो फेनील पाण्यात तुषार उधळित पाऊस रंगात रंगे धो धो विजेचा आसूड फिरवित ढगात पाऊस हुंदडे धावे धो धो मात्रावृत्त (१०+४+४=१८ मात्रा)
-
पाऊस वेड लावी – PAAOOS VED LAAVEE
कोषातल्या कळ्यांना पाऊस ओढ लावी पाऊस वेड लावी मौनातल्या गळ्यांना पाऊस ओढ लावी पाऊस वेड लावी गळतात छप्परे भिंतीस पोपडे पण सुविचार मांडणाऱ्या शाळेतल्या फळ्यांना पाऊस ओढ लावी पाऊस वेड लावी घेऊन कागदांचे गलबत जहाज होड्या येतात बालके मग ओढे झरे तळ्यांना पाऊस ओढ लावी पाऊस वेड लावी भेगाळल्या धरेला मातीस तापलेल्या शिम्पावया फुलांनी बागा…
-
आषाढ मेघ – AASHAADH MEGH
करण्यास चिंब मजला आषाढ मेघ आला फिरुनी जुन्या स्मृतींचे घेऊन वेड आला आलिंगण्यास वेगे शोधीत मेघ मजला नाठाळ वारियाचा होऊन वेग आला तेजाळ वीज प्यार माझ्यातली धराया घन नीळ अंबराला पाडून भेग आला घनघोर वादळाशी झुंजून मेघ न्यारा दारात ओढलेली मिटवून रेघ आला तो एकमेव वेडा माझ्याहुनी दिवाणा सारे कडू विषारी रिचवून पेग आला अक्षरगणवृत्त…
-
ऐकेन आज काही – AIKEN AAJ KAAHEE
ऐकेन आज काही पण बोलणार नाही शब्दांस काव्य भरल्या मी छाटणार नाही सांगून टाक हृदयी कुठले रहस्य दडले ऐन्यात त्यास लपुनी मी पाहणार नाही जाई जुई चमेली चाफा नि मोगऱ्याला टोचूनिया सुईने मी गुंफणार नाही झाकून नेत्र दोन्ही ऐकेन देहबोली डोळ्यात भावनांना मी शोधणार नाही आताच पावसाचे मज बंद पत्र आले उघडून त्यास सुद्धा मी…
-
मेघदूत MEGH DOOT
मेघदूत श्याम श्वेत मूक मूक लोचनात गर्द दाट रान शेत मूक मूक लोचनात माय ओणवी जलास शिम्पतेय अंगणात कृष्णरंग पेरलेत मूक मूक लोचनात सान बालिका खुडे फुले मनात गात गात मुग्ध भावना सचेत मूक मूक लोचनात पौर्णिमेस नाचतेय लाट लाट सागरात शंख शिंपले नि रेत मूक मूक लोचनात ही हवा ढगाळ कुंद दावतेय आरशास कैक…
-
पाऊस पाऊस – PAAOOS PAAOOS
रानात वेशीत गावात येणार पाऊस पाऊस फेकून लाजेस मेघात येणार पाऊस पाऊस प्रीतीस वाऱ्यात ओढीत माझ्या मनीच्या गुलाबात ओढाळ वेल्हाळ जीवात येणार पाऊस पाऊस वृत्तात मात्रात गीतात गात्रात पात्रात गोष्टीत तल्लीन दूरस्थ देहात येणार पाऊस पाऊस गात गुराखी शिवारात आनंद ओतून पाव्यात ढंगात रंगात झोकात येणार पाऊस पाऊस नेत्री कुणाच्या भरायास गाली सुनेत्रा झरायास प्राजक्त…