-
मुस्कट दाबिन – MUSKAT DAABIN
पाताळातुन तुजला शोधिन नाव सुनेत्रा लावे मी प्रकाशवेगा मागे टाकिन नाव सुनेत्रा लावे मी जरी नाटके करून सोंगे येशिल माझ्या पुढ्यात तू तुझे मुखवटे उखडुन फेकिन नाव सुनेत्रा लावे मी कलशावरती करुन मुलामा म्हणे जरी तो चंद्र पहा प्रकाशासही काळे फासिन नाव सुनेत्रा लावे मी मणामणाचे जरी घुंगरू दिलेस मज तू बांधाया तुडवुन तुजला गाईन…
-
नजरकैद – NAJAR KAID
शब्दांना भोगले तरीही शब्दांना जागले विषयांनी ग्रासले तरीही विषयांना जागले वस्त्र बदलले देश बदलले भोगांसाठी नव्या भोगांनी गाडली सुखे पण भोगांना जागले स्तुति सुमनांना भुलून जाता तनू पुलकित झाली गंधांनी भाजून निघाले गंधांना जागले अनुरागातच रमले झुरले नजरकैद जाहली रागांनी कोंडले मला पण रागांना जागले रुपांतर रंगांतर केले मूळ स्वभाव तसाच अनेक धर्मी स्वभाव जपण्या…
-
सोंगाडे – SONGAADE
अनंत रूपे घेउन छळण्या कैक भेटले सोंगाडे सिद्धपथाला तुक्या लागला जरी कुणी ना वाटाडे किती भामटे भोंदू साधू भोळे शंकर भासविती डोईवरच्या जटा वाढवुन घालुन फिरती अंबाडे आकाशातिल ग्रह ताऱ्यांना कुंडलीत का बसवीती दिशाभूल करण्या भोळ्यांची लुटण्या त्यांना थापाडे मृत व्यक्तीचे शरीर जाळुन अथवा मातीत गाडून नाश पावते तनु अन उरती फक्त सापळे सांगाडे खरी…
-
हंगामा – HANGAAMAA
वृद्ध घालता धिंगाणा किती माजला हंगामा नाठी बुद्धी साठीला प्रत्यंतर बघ हा दंगा आजोबांच्या काठ्यांनी चोपचोपले अंगांगा आगडोंब वळ उठलेहे बोलव आगीच्या बंबा बंबाची वाजे घंटा पोरांनो थांबा थांबा गझल मात्रावृत्त (मात्रा १४)
-
कवित्त्व – KAVITTV
लिहित रहा तू स्वतःस कळण्या हवे स्वतःला काय दुखविलेस का व्यर्थ स्वतःला कारण शोधुन काढ संदेहाच्या हिंदोळ्यावर झोके घेत अनेक विचार घुसळुन सापडेल तुज काव्याची लय छान भुकेल्यास दे घास स्वतःतिल प्रेम मुक्या जीवास प्रायश्चित्तासाठी आता कशास व्रत उपवास भेटीसाठी जो जो आतुर फक्त तयांना गाठ गाठीभेटी घडण्यासाठी प्रयत्न कर तू खास गुरू स्वतःचा स्वतःच…
-
साळूता – SAALOOTAA
गोरी गोरी राधा गवळण जळात जाळे सोडे फिरवुन जाळे बुडता पाण्यामध्ये मासे फिरती झुळकन सुळकन लहरत विहरत जाळ्याभवती कुणी अडकते तयात पटकन मासोळी कुणी चंचल चपला निसटे जाळ्यातुनही पटकन जाळे फेकत काठावरती हसते गोरीमोरी गवळण भरले मडके घेउन येई घरी आपुल्या ठुमकत गवळण मडके ठेउन तुळशीपाशी साळोत्याने झाडे अंगण मात्रावृत्त(१२+४ =१६ मात्रा)
-
भिजल्या पानावरी – BHIJALYAA PAANAAVAREE
भिजल्या पानावरी लिहावी गझल तुझ्यासाठी घडवावे मी मरूनसुद्धा नवल तुझ्यासाठी घडवायाचे मला न काही दाखविण्यासाठी खिरुनी विरुनी होतिल स्वप्ने तरल तुझ्यासाठी शिशिरामध्ये पाने गळती धरा शुष्क होते मी ग्रीष्मातिल वळवाची सर सजल तुझ्यासाठी प्रभात समयी पानांवरती टपोर दवबिंदू बनेन मी त्या दवबिंदूसम धवल तुझ्यासाठी कधी वात मी कधी ज्योत मी कधी कधी समई कधी नीर…