Tag: Marathi Ghazal

  • तिन्हीसांज – TINHEESAANJ

    सकाळी दुपारी लिहावी गझल तिन्हीसांज होता स्मरावी गझल गझल रडव रडवी कधी गाउनी हझल मग लिहावी पुसावी गझल रदीफास टाळे गझल जेधवा म्हणे काफिया मग हरावी गझल पहाटे प्रभाती सकाळी सजल दवाने उन्हाने नहावी गझल लहर वारियाची अधर चुंबिता मिटावी फुलावी झुलावी गझल नयन कारण व्हावी तनू कापरी तिच्या कंपनांनी टिपावी गझल झरझरा खिरे ज्ञान…

  • तुझ्याचसाठी – TUZYAACH SAATHEE

    तुझ्याचसाठी अजूनही मी जुन्या स्मृतींच्या उन्हात आहे झरे इथे लेखणी सुवासिक नव्या सुरांनी वहात आहे कधी न कळले तुला जरी हे तुझ्यात गाणे सदैव माझे तुडुंब भरले हृदय जलाने तुझीच प्रतिमा तयात आहे खरेच मी सावरेन आता पुन्हा पुन्हा मी पडेन जेव्हा तुझीच काठी असेल हाती तिच्याचसाठी घरात आहे नको कुठे मज नभात शोधू तुझ्यात…

  • स्थित्यंतर – STHITYANTAR

    होईलच स्थित्यंतर आता गोळा केले कंकर आता नकोच काढू अत्तर आता फूल जाहले पत्थर आता म्हणता बुळ्ळ्या मंतर आता यमी कापते थरथर आता कर तू उघडे अंतर आता त्याविन ना गत्यंतर आता फोड मुठीने फत्तर आता उपाय सुचतिल सत्तर आता पत्थरात का देव राहतो प्रश्न नको दे उत्तर आता नहीच रे मै स्वरुपसुंदरी कुरुपच म्हण…

  • कळसवणी – KALASAVANEE

    कुंडलिया मी म्हणू तुला की कुंडलिनी बोल चाँद पुरा मी म्हणू तुला की ‘मखर झणी’ बोल नेत्र तुझे चंचले दुधारी कापत जातात नीरज त्यांना कसे म्हणू मी मंगळिनी बोल मंगळिशी तू सदा मला का चेपविण्या भीड मीच बरा सापडे दिवाना ‘कळसवणी’ बोल अंग तुझे हे फिकेफिकेसे गारठुनी जाय सांगतसे मी कथा फुलांची मुग्ध शनी बोल…

  • ठेका – THEKAA

    हाय मी वेडी कितीरे समजले वेडा तुला मस्त तू मैफल गझलची समजले मेळा तुला खात जाशी गोड सारे आवडीने आजही जो दिला पेढा तुला मी वाटला पेठा तुला मी फिदा होतेच तुजवर कालही अन आजही कान भरण्या ते टपोनी समजले केव्हा तुला द्यायचा होता तयांना धवल तुज शेला जरी मी दिलेला जर्द हळदी शोभतो फेटा…

  • बाधा – BAADHAA

    कधी कधी मी माझी आई कधी कधी चित्रातिल दादा कधी खोडकर कृष्ण कन्हैया कधी कधी मी गोरी राधा घननीळाच्या अधरांवरची जशी बासरी स्वरुप सुंदरी तशीच मीही मुग्ध कुमारी प्रिय गझलेतिल रदीफ साधा फिरव अशी जादूची कांडी स्वर अन व्यंजन सजीव व्हावे शब्द असूदे पूर्ण रूप वा किंचित अधुरा अर्धा आधा गझल बोलते मात्रांमधुनी सहज तरीही…

  • कशास भेटणे तुला – KASHAAS BHETANE TULAA

    कशास भेटणे तुला कधीतरी कधीतरी दुरून तू पहा मला कधीतरी कधीतरी तुलाच वाटते असे कठोर मी बनेल मी मृदूच मी जरी फुला कधीतरी कधीतरी कशास साठशी इथे विहीर वा तळ्यामधे खळा खळा वहा जला कधीतरी कधीतरी अता जरी बसून तू स्मृतीत मौन स्तब्धही बनेन मी तुझा झुला कधीतरी कधीतरी हवेस सांग वाहण्या सुगंध घेउनी तुझा…