Tag: Marathi Ghazal

  • काय लिहू मी – KAAY LIHOO MEE

    काय लिहू मी कैसे बोलू शब्द थांबती अडखळती मौन मुग्ध मन सखा सोबती अश्रू गाली झरझरती कधी अचानक बांध फुटोनी भावभावना फुसांडती अज्ञाताच्या कड्यावरोनी आवेगाने कोसळती प्रश्न दाटती कैक मानसी उत्तर त्याचे मिळेलका पुढच्या जन्मी तरी भेटुया गझलेच्या काठावरती तुझे नि माझे नाते कुठले मला सदाचे कोडे हे कोड्यावरती कोडी घालत शब्द वहीवर थरथरती नको…

  • मम सांजेचा रंग केशरी – MAM SANJECHAA RANG KESHAREE

    मम सांजेचा रंग केशरी निळी जांभळी निशा नाचरी प्रभात ल्याली हळदी शालू किती देखणी जरी बावरी सकाळ गोरी मस्त गव्हाळी विरघळलेली मधुर साखरी दुपार सोन्यासम झळझळते संध्या श्यामल दिसे लाजरी संधिकालची बेला सुंदर अधरांवरची जणू बासरी  

  • मंगल बेला – MANGAL BELAA

    मंगल बेला हळदी शेला गझल विड्यांचा शायर ठेला मुखचंद्रावर मस्त तजेला सुंदर स्वप्ने हवी निशेला अमर्त्य आहे माझा चेला

  • तुळस मोगरा – TULHAS MOGARAA

    ठेवू कोठे तुळस मोगरा गच्च दाटला हरित कोपरा काव्य बहरले पान-फुलांनी सैल जाहला देह चेहरा बैल उधळतिल हातामध्ये धरून ठेव तू घट्ट कासरा शेवटचे दिस गोड व्हावया हळू हळू थांबतो भोवरा मधुर फळांची बाग शिंपण्या आडामध्ये जाय पोहरा सुखी जाहली माझी बाळे ऐकव गझला अता शायरा चढून जाऊ डौलामध्ये वळणदार हा मस्त दादरा

  • मला सापडे ती – MALAA SAAPADE TEE

    कळाया नव्याने मला सापडे ती सदा घोळ घाले तरी आवडे ती किती नाक अपरे नयन नीलकांती जणू बाहुली बोलते बोबडे ती तुझी बायको तिज कसे मी म्हणावे कधी सारवीते तुझे झोपडे ती तुला तीट लावे तुझी दृष्ट काढे तुला घालते अंगडे टोपडे ती बटा स्वैर उडता कुरळ कुंतलाच्या तया तेल भारीतले चोपडे ती जरी अर्घ्य…

  • ठेला – THELAA

    कविता मम शब्दांचा झेला रंगवून तिज घे शेजेला रम्य कल्पना खुले कागदी चित्रासम संध्येची बेला स्वातीचा शिंपला मनोरम अगणित पानांचा जणु ठेला शिवगंगा धरणीवर आली माळ जयश्री तृणबालेला घटिका मंगल जवळी आली घे मीना अंगावर शेला मात्रावृत्त – ८+८= १६ मात्रा

  • बाई बाई – BAAEE BAAEE

    मुक्तक लिहुकी गझल रुबाई म्हणू पाळणा की अंगाई नाव फुला तुज कुठले देऊ गुलबक्षी की चंपक जाई आतुन आतुन उचंबळे कढ अश्रू टिपण्या नकोच घाई पणती ठेऊ तुळशीपाशी परतुन येता गुरे नि गाई गोरज समयी धूळ रंगते सूर्यास्ताची ही नवलाई मनात काहूर हृदयी हुरहुर आठवती दादा अन आई खट्याळ वारा पदर उडवितो शीळ घालुनी बाई…