Tag: Marathi Ghazal

  • वत्सल देवी – VATSAL DEVEE

    अता प्रभाती फुलापरी मी पहाट स्वप्नामधे दिसावे असेच सुंदर स्वरूप माझे सतेज हृदयी तुझ्या फुलावे वनहरिणी मी किरण शलाका उधाणलेली कधी जलौघा निळे सरोवर प्रशांत सागर विलीन होण्या मला खुणावे धरेवरी या पिकोत मोती उदंड मुबलक फुले फुलावी सुजाण शासक असा असावा असी मसी अन कृषी फळावे अचौर्य पालन व्रतास धरण्या कुणी न चोऱ्या इथे…

  • स्वभाव – SWABHAAV

    स्वभाव माझा तुला कळावा विभाव विपरित मला कळावा कुरूप म्हणजे धरा स्वरूपी खराच सम्यक तिला कळावा कमाल विकृति जळून जाण्या निसर्ग प्रकृतितला कळावा तनास जपण्या मना फुलविण्या धरेतला धर फुला कळावा जरी न अक्षर टपोर मोती तयातला गुण जला कळावा फिरून त्याला बघेन यास्तव बराच की तो भला कळावा जरी कमी तो असेल बोलत विखार…

  • मंगल ललाट – MANGAL LALAAT

    जलौघवेगा सुसाट सुंदर प्रवाह खळखळ विराट सुंदर धबाबणारा प्रपात दावी रुपास अपुल्या अचाट सुंदर वळून झाले उसवुन झाले पुन्हा विणूया चऱ्हाट सुंदर अगीनगाडी रुळावरोनी मजेत धावे तराट सुंदर मिरवित आहे हळद नि कुंकू सतेज मंगल ललाट सुंदर निशांत झाला खरा सुनेत्रा नवी गुलाबी पहाट सुंदर वृत्त – जलौघवेगा, मात्रा १६ लगावली – ल गा ल…

  • निळाई – NILAAEE

    भरात आली गझल गुणाची सुखात भिजली विमल गुणाची दवात भिजवी फुलांस साऱ्या अशीच ती रे सजल गुणाची तुला न कळली तिला न कळली कमाल तिचिया अचल गुणाची मृणाल बनते मुलांस जपण्या खरीच सुंदर कमल गुणाची कितीक आले जरी मळविण्या कधीन मळते अमल गुणाची विरून जाई खिरून जाई मृदुल मनाची तरल गुणाची जशी निळाई तशी सुनेत्रा…

  • रुमाल – RUMAAL

    लिहीन काही नवे नवे मी सुचेल जे जे मला हवे मी कलम असे गुज करे वहीशी पुन्हा पुन्हा तेच आळवे मी थकेल जेव्हा रुमाल माझा टिपून घेईन आसवे मी जरीन दांडू करात माझ्या चुकार विट्टीस टोलवे मी उडवित बसते निळ्या मनाचे प्रभात होता नभी थवे मी निळ्या समुद्रास गाज सांगे रड्या तरंगास हासवे मी निघेन…

  • नवी भरारी! NAVEE BHARAAREE!

    नशीब म्हणजे नवी भरारी! स्वतःच घ्याया हवी भरारी!! प्रभात होता!! कुणी निशाचर! म्हणेल घेना रवी भरारी!! सुजाण या! मैफलीत माझ्या… असेल ही भैरवी भरारी!!!! पिसे गझलचे! नभी तरंगे!! तनू तिची!आळवी भरारी! हृदय असे हे!! बुलंद माझे!!! विधीलिखित- वाकवी भरारी!!! वृत्त – जलौघवेगा, मात्रा १६ लगावली – ल गा ल गा गा/ ल गा ल गा…

  • व्योमगंगा – VYOMA GANGAA

    त्या तिथे कोणीच नव्हते पण तरी ती भीत होती आतला आवाज म्हणतो हीच मोठी जीत होती मृदु निरागस भाव नयनी उंबराचे फूल जणु ती पण तिला ठाऊक नव्हते ती स्वतः संगीत होती अंतरीचा नाद दिडदा ऐकता हरवून गेली हरवली पण गवसलेले शब्दधन सांडीत  होती मेघमाला भासली ती वाटिका फुलवून गेली मेघमाला सावळी पण वाटिका रंगीत…