-
जांभई – JAAMBHAEE
जांभई येतसे झोपना बाळही झोपले झोपना हे धुणे साठले रोजचे फक्त मी धूतसे झोपना त्रासका हा तुझा आजही पाहुणे यायचे झोपना कोठली गोष्ट मी सांगुरे चांदणे लोपले झोपना गीत तू गा सखे गोडसे चंद्रिका सांगते झोपना वृत्त – गा ल गा, गा ल गा, गा ल गा.
-
अधीर मस्त नाचरा – ADHEER MAST NAACHARAA
स्वरात कंप कापरा अधीर मस्त नाचरा मधाळ धुंद बावरा अधीर मस्त नाचरा कवाड बंद का असे उनाड वात तापण्या झरावयास मोगरा अधीर मस्त नाचरा लिहावयास लावणी भिजेल आज टाकही बनेल लाज-लाजरा अधीर मस्त नाचरा तुलाच चुंबिण्या प्रिये झुलेल श्रावणात तो उडे धरून कासरा अधीर मस्त नाचरा कपोत हूड गोल तो खुलेल पावसात या म्हणेल गाच…
-
डॉटर – DAUGHTER
श्रावणाची डॉटर मी चक्रवाली पॉटर मी नीर आहे गडद निळे हॉट नाही हॉटर मी गाठ नाजुक मारतसे गुरव अस्सल नॉटर मी झेल घेण्या अवघड रे हात सुंदर कॉटर मी मोरपंखी बॉटलचे शुद्ध क्षारद वॉटर मी वृत्त -गा ल गा गा, गा ल ल गा
-
गटारी – GATAAREE
आली पुन्हा गटारी आता धुवा गटारी काढून गाळ कचरा झाडून घ्या गटारी येता अवस दिव्याची लावा दिवा गटारी प्याल्यात गझल बघुनी हसती पहा गटारी मद्यालयास टाळा लावे नवा गटारी वृत्त – गा गा ल गा, ल गा गा.
-
खापरतोंड्या – KHAAPAR TONDYAA
खापरपणती ढोपरआज्ज्या म्हणती नातवा नको छळू वृद्ध जाहलो खापरतोंड्या तुझ्यामागुनी किती पळू खापरखापर नातू नाती नावे पाडुन तुज थकल्या खापरढोपर आज्जा होउन नकोच वाती अता वळू सदैव उघडे तोंड तुझे हे मीट पाडण्या बत्तीशी पापांकुर तव मुखात शिरण्या पहा लागले इथे वळू जरी चावडी दिलीस आंदण धुण्यास कट्टा नीर नसे भळभळणाऱ्या जखमासुद्धा झरू लागल्या किती…