-
तरीही – TAREEHEE
भर बाराची वेळ तरीही कोकिळ ताना घेय तरीही कुठे कावळा क्रो क्रो करतो जुनाट वाहन वेग तरीही चिकचिक दलदल अवती भवती खातो कोणी भेळ तरीही शिट्टी वाजे कुठे कुकरची शिजे चुलीवर पेज तरीही कार कुणाची पुढे न जाते उघडे आहे गेट तरीही पदर उडे हा वाऱ्यावरती कुणी पकडते शेव तरीही माप सुनेत्रा तुझेच असली शेवटचा…
-
शेम शेम – SHAME SHAME
प्रेम-लग्नात हुंडा-बिंडा, हे कसलं प्रेम लग्नाआधी देह-संबंध, म्हण शेम शेम उलटी टीप अन धावदोरा, इथे न चाले पिको यंत्रास बाजुला ठेव, घाल बरं हेम मराठी खरी दिलदार परी, इंग्रजी म्हणे “आली आली” म्हणता म्हणता, करे “कम केम” माय मऱ्हाटी बहिणाबाई, कानडीचीगं कन्नड मराठी सीमेवरी, बोलुया सेम गुजरांचा केम छे केम छे, सर्वांना कळे आट खेळ…
-
नीतळ चष्मा – NEETAL CHASHHMAA
टाक झाडुनी वाकुन वाकुन पाला पाचोळा स्वच्छ कोपरा बघून त्याला कर लवकर गोळा ढीग पडे हा झोपाळ्यावर धुतल्या वस्त्रांचा नकोस घालू घड्या बिड्या तू कर चोळामोळा नीतळ चष्मा घाल धुळीतिल करताना कामे उडता कचरा डोळ्यामध्ये धू लवकर डोळा दगडासम बघ तनमन झाले जागी हो आता झोके देण्या मनास सखये बांधच हिंदोळा गाई गुरांना खाण्यासाठी बनव…
-
दूत – DOOT
पावसाचे दूत आले उठवरे अता पाले जागा भिंती छप्पराची जिथे वाळू अंगणाले झाडझूड स्वच्छ कर रांगणारे बाळ चाले चहा कर आम्हासाठी ठेचूनिया घाल आले करायचे खूप काही नको म्हणू झाले झाले हाक मार प्रेमाने तू सून म्हणे आले आले लेक आणि जावायाला सांग ठेवायला भाले मानपान कर नीट आले सारे साली साले सुनेत्राचा गोतावळा फुलांसवे…
-
एलोव्हेरा -ALOEVERA
नाजुक साजुक एलोव्हेरा म्हणते भारत माझा मेरा बर्फाविन मज दे इक्षूरस चषकामध्ये सुंदर येरा पुर्वेवरती अरुण उगवला प्रभात म्हण वा त्यास सवेरा सूर्योदय होताच धरेवर वाहन माझे निघे तवेरा बोट दाखवुन यू यू म्हणशी म्हणे ‘सुनेत्रा’ घालच फेरा
-
शेष – SHESSH
रंगले जरी कधी रंग ना मी उधळले फक्त प्रेम ठेवुनी शेष काही विसरले तुझ्याच आठवात मी दंगले पुन्हा पुन्हा तुलाच शोधले पुन्हा जरी कधी हरवले फुलापरी हसत मी चालले तुझ्यासवे घसरता चुकून पाय हात फक्त पकडले पुरेच खेळ हा सख्या कोसळू अता पुरे म्हणत म्हणत मी तुला हळूहळूच बरसले नाव मी तुझे खरे जपून ठेवले…
-
उनाड – UNAAD
सांग मला भेटण्यास त्या उनाड पारव्यास अंतरात साठवून प्रेम उतर नाचण्यास ये इथेच राहण्यास पावसास पाडण्यास भीत नाय मी कधीच आषाढी गारव्यास भाग पाड लबाडास खरे तेच बोलण्यास मोल असे जाण अता गात गात खिदळण्यास जन्म घे पुन्हा पुण्यात सुनेत्रास हरवण्यास