Tag: Marathi Ghazal

  • फुलझडी – FULZADEE

    गझल माझी मधुर बाला वाचते बाराखडी वाचताना बरसते बघ चांदण्यांची फुलझडी चंद्र सुंदर अंबरीचा रंगलेला या क्षणी मुग्ध त्याचे रूप कोमल टिपुन घेते ही घडी तारकांचा खेळ चाले पकडण्या उल्केस या सापडेना ती तयांना खेळती मग त्या रडी ही न उल्का ही कळीरे आत्मगंधी दंगली फेकण्या जाळे तिच्यावर राज्य घेई नवगडी राज्य घेतो ध्रुव जेव्हां…

  • भेट – BHET

    पेरता मी बियाणे खरे नंबरी वृक्ष चुम्बेल आता घना अंबरी काय देऊ तुला भेट मी सुंदरी नाद हृदयातला वाजता घुंगरी शोधण्या फूल दुर्मीळ जे माणसा रानवाटा फिरे मी तळी अंतरी दावले रूप देवा तुझे मी जगा प्राण ओतून मूर्तीतल्या कंकरी मी लढे माझिया सावळ्या  मिळविण्या होउदे जीत वा अंत या संगरी वृत्त – गा ल…

  • मजा – MAJAA

    जाण आता खरी ताणण्याची मजा ताणता ताणता जाणण्याची मजा ज्यास कळते पुरी लांबण्याची मजा त्यास भावे न ती खेचण्याची मजा ढील आता कशाला हवी रे तुला घे नभी वावडी काटण्याची मजा थंड ओठांवरी ठेवुनी ओठ तू लूट बर्फामधे गोठण्याची मजा सांग कारे  तुला ना कळाली कधी जिंकुनीही रणी हारण्याची मजा वृत्त – गा ल गा, …

  • माझा वसा – MAAZAA VASAA

    बोलण्याचा खरे मी वसा घेतला जोडण्याचा घरे मी वसा घेतला बंद दारे तुटोनी हवा यावया मारण्याचा छरे मी वसा घेतला कातळाला फुटाया नवी पालवी खोदण्याचा झरे मी वसा घेतला कैक काटे फणस खोबरी सोलुनी काढण्याचा गरे मी वसा घेतला दोन रेखावया नेत्र दगडावरी पाडण्याचा चरे मी वसा घेतला वृत्त – गा ल गा, गा ल…

  • जगण्याचा उत्सव – JAGANYAACHAA UTSAV

    मी माझ्या जगण्याचा उत्सव तू माझ्या फुलण्याचा उत्सव आठवणी रंगात बुडवुनी प्रेमाने खुलण्याचा उत्सव रिक्त जाहल्या धरणांमध्ये तुडुंब जल भरण्याचा उत्सव मोद वाटुनी मुदित होउनी खळखळुनी हसण्याचा उत्सव काव्यसरींच्या धारांमध्ये चिंब चिंब भिजण्याचा उत्सव मात्रावृत्त (८+८=१६ मात्रा)

  • सण मनभावन – SAN MANBHAAVAN

    हिरव्या पानी फुलेल फुलवा सुगंध उधळित हसेल मरवा सतेज हळदी कुंकुमवर्णी प्रीत प्राशुनी भरेल गडवा मंदाग्नीवर मृदुल करांनी काटेरी घन खुलेल हलवा गोड हासऱ्या लेकींसाठी फांदीवरती झुलेल झुलवा अनुरागाचे गीत गुलाबी रागामध्ये सुरेल बसवा सत्त्यासाठी प्रेमासाठी सैनिक अमुचा लढेल कडवा वाण लुटाया संक्रांतीचे सण मनभावन असेल बरवा मात्रावृत्त (८+८=१६)

  • चित्र रेखाटिता – CHITR REKHAATITAA

    चित्र रेखाटिता हरित पावलांनी नाव ही रेखिले मृदेच्या कणांनी उच्छवासापरी धुराडे चुलीचे ओकते काजळी भरोनी ढगांनी आरसा पाहुनी नटावे सजावे स्वप्न डोळ्यातले गुलाबी क्षणांनी गंध मातीतला मिळाला हवेला शिंपिता अंगणी सडा या घनांनी लागले भृंगहे इथे ते घुमाया काव्य शाकारता कळ्यांनी फुलांनी वृत्त – गा ल गा, गा ल गा, ल गा गा, ल गा…