Tag: Marathi Ghazal

  • पात्र – PAATRA

    आत्मघाती संस्कृतीचा कळस खोटा छान तू सुंदरांच्या प्रकृतीचा पाय सोटा छान तू संधिसाधू बेरकी ते अक्षरांना बदलती मस्त त्यांना ठोक द्याया दगड गोटा छान तू मंदिरे ते बांधताती फायदा लाटावया संत बनुनी कमव आता पुण्य तोटा छान तू मोडण्या लग्ने तयांचा कुंडलीचा फार्स हा गूण मग जुळवीत बसती मोज नोटा छान तू हाच मोठा मीच…

  • अंनिस – ANNIS

    विचार अमुचा आहे पक्का म्हणते अंनिस उठेल पेटुन मानव सच्चा म्हणते अंनिस नकोत शस्त्रे जिंकू युद्धे बाहुबलाने अभय व्हावया बालक बच्चा म्हणते अंनिस बंधुत्वाची ज्योत तेवण्या दृष्टी देण्या दादा भैय्या भाऊ अण्णा म्हणते अंनिस हत्या करुनी भ्याड पळाले तोंड लपवुनी निसर्ग त्यांना देइल धक्का म्हणते अंनिस विज्ञानाचे मर्म जाणुनी शास्त्र जाण रे कर श्रद्धेचा पाया…

  • निश्चय अमुचा – NISHCHAY AMUCHAA

    भयास जाळू निश्चय अमुचा नाती जोडू निश्चय अमुचा मायाचारी कपट वक्रता उखडुन टाकू निश्चय अमुचा परम अहिंसा धर्म सुखाचा हिंसा त्यागू निश्चय अमुचा जीव जपूया मने जपूया बकबक टाळू निश्चय अमुचा हवे कशाला नाटक जगण्या खऱ्यास माळू निश्चय अमुचा मात्रा-सोळा=(आठ+आठ), १६=८+८.

  • सत्य – SATYA

    जिंकणार सत्य आज वाजणार सत्य आज पाहताच मुग्ध भाव लाजणार सत्य आज शुभ्र मेघ अंबरात हासणार सत्य आज वीज नाचता नभात वर्षणार सत्य आज खोडसाळ जो तयास चोपणार  सत्य आज आत्मरूप दर्पणात भाळणार सत्य आज नेत्र नयन लोचनात झळकणार सत्य आज वृत्त – गा ल, गा ल, गा ल, गा ल.

  • अभ्युदय – ABHYUDAY

    फुलते खुलते मुग्ध मधुर सय उडवुन लावी मरणाचे भय जुळव करांना हृदयापाशी जै जै अथवा करण्या जय जय अभ्युदय करत तव आत्म्याचा दीपक बन रे रत्नत्रयमय शास्त्यामधला अस्त पळवुनी चंद्रोदय अन हो सूर्योदय चाफा हिरवा पिवळा धवला हसतो  म्हणतो विसर अता वय त्या लपलेल्या काढ अहंला फळ मिळवाया सुंदर रसमय व्यवहाराला चोख ‘सुनेत्रा’ शक्ती इतुका…

  • शहारे – SHAHAARE

    आठवले मज वेडे सारे पुष्प-सुगंधित झाले वारे पापण काठी मौनी अश्रू नकळत त्यांचे बनले तारे मुग्ध मधुर ते रूप परंतू मम नेत्रांवर सक्त पहारे भेटायाला उत्सुक कोणी म्हणुनी जपले क्षण मी खारे माझ्या इच्छा दवबिंदूसम पुण्य असे जणू तप्त निखारे वाजविण्या मन तबला सुंदर काया पिटते ढोल नगारे प्रेम खरे पण रंग बघाया बदलत गेले…

  • कुंकुम औक्षण – KUMKUM OUKASHAN

    रक्षाबंधन व्रत अमुचे माता रक्षण व्रत अमुचे छत्र जपाया वडिलांचे कुंकुम औक्षण व्रत अमुचे स्वतःच बांधू करी अता सम्यक कंकण व्रत अमुचे घरास खिडक्या दरवाजे ठेवू अंगण व्रत अमुचे सुगंध देण्या जगताला होऊ चंदन व्रत अमुचे श्वास मोकळा करावया फुलवू नंदन व्रत अमुचे नीर सुनेत्रा खळखळण्या विचार मंथन व्रत अमुचे मात्रा-चौदा=(आठ+सहा), १४=८+६