भृकुटीवरचा – BHRUKUTEEVARACHAA


भृकुटीवरचा तीळ आवडे
वळणदार तव पीळ आवडे

भरवतेस मज प्रेमभराने
शब्द तुझा मग गीळ आवडे

मुक्त पाखरू उडे बागडे
तुझी वारिया शीळ आवडे

करून गुन्हे थकती त्यांना
लपावयाला बीळ आवडे

सफेद कपड्यांना तू माझ्या
घातलीस ती नीळ आवडे

मोहांधांच्या पायामध्ये
बसवलीस ती खीळ आवडे

तांब्या पितळेच्या भांड्याना
आत कल्हई कथीळ आवडे
अखंड झरझर उलगडणारा
नोटांचा मज रीळ आवडे

मात्रावृत्त – ८+८ =१६ मात्रा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.