Tag: Marathi Ghazal

  • शहारे – SHAHAARE

    आठवले मज वेडे सारे पुष्प-सुगंधित झाले वारे पापण काठी मौनी अश्रू नकळत त्यांचे बनले तारे मुग्ध मधुर ते रूप परंतू मम नेत्रांवर सक्त पहारे भेटायाला उत्सुक कोणी म्हणुनी जपले क्षण मी खारे माझ्या इच्छा दवबिंदूसम पुण्य असे जणू तप्त निखारे वाजविण्या मन तबला सुंदर काया पिटते ढोल नगारे प्रेम खरे पण रंग बघाया बदलत गेले…

  • कुंकुम औक्षण – KUMKUM OUKASHAN

    रक्षाबंधन व्रत अमुचे माता रक्षण व्रत अमुचे छत्र जपाया वडिलांचे कुंकुम औक्षण व्रत अमुचे स्वतःच बांधू करी अता सम्यक कंकण व्रत अमुचे घरास खिडक्या दरवाजे ठेवू अंगण व्रत अमुचे सुगंध देण्या जगताला होऊ चंदन व्रत अमुचे श्वास मोकळा करावया फुलवू नंदन व्रत अमुचे नीर सुनेत्रा खळखळण्या विचार मंथन व्रत अमुचे मात्रा-चौदा=(आठ+सहा), १४=८+६

  • राणी – RAANEE

    मी मुक्त मनाने, लिहित राहिले काही; उघडली दिशांची, मौन अंतरे दाही! त्या गात म्हणाल्या, मम हृदयाची गाणी; “सावळ्या धरेला अंबर म्हणते राणी”… रुबाई – मात्रा बावीस(दहा+बारा), २२=१०+१२

  • अहिंसा – AHINSAA

    सदैव असुदे मनात माझ्या प्रीत अहिंसा खरी अनेकांतमय सत्यासाठी जीत अहिंसा खरी सम्यग्दर्शन ज्ञान मिळविण्या जीव साधना करी चारित्र्याच्या घडणीसाठी रीत अहिंसा खरी मुक्तक- मात्रा सत्तावीस=(आठ+आठ+आठ+तीन), २७=८+८+८+३

  • उकार सुंदर – UKAAR SUNDAR

    हसण्याचे किती प्रकार सुंदर पाहुनी लिहिती हुशार सुंदर कशास घुसळुनी मिळते लोणी कुलूपबंद कर विचार सुंदर दशधर्मातील सहा पुरवण्या शोधा त्यातील नकार सुंदर स्वगतामधूनी मुक्त व्हावया ज्योत समईची रफार सुंदर पंचमेरूचे शिखर गाठण्या वेलांटीयूत उकार सुंदर मात्रा -सतरा=( नऊ+आठ), १७=९+८

  • मोक्ष हवा – MOKSH HAVAA

    पुरे जाहली, अता परीक्षा, मोक्ष हवा मज, मोक्ष हवा लपले त्यांना, देण्या शिक्षा, मोक्ष हवा मज, मोक्ष हवा मुला-फुलांना, सुखी ठेवण्या, प्राणपणाने, लढेन मी सत्य जाणण्या, उपाय दीक्षा, मोक्ष हवा मज, मोक्ष हवा बांध घालण्या, स्वैरपणाला, हवेच शासन, धर्माचे प्रत्येकाला, सुंदर कक्षा, मोक्ष हवा मज, मोक्ष हवा जपती सारे, जीव जिवांना, हाच स्वर्ग रे, असे खरा…

  • अंतर श्रावण – ANTAR SHRAAVAN

    आलाय देखणा अंतर श्रावण आभाळ मंदिरी झुंबर श्रावण झोकात चालल्या ललना मोहक घाटात पाहण्या सुंदर श्रावण सांजेस सावळी पणती तेवत कानात बोलते मंतर श्रावण श्रद्धेस, आंधळ्या, नजरा डसता अंधार फोडतो कंकर श्रावण ज्येष्ठात रंगता गायन वादन आषाढ संपता नंतर श्रावण वृत्त- गा गा ल, गा ल गा, गा गा, गा गा.