Tag: Marathi Ghazal

  • तहान – TAHAAN (thirst)

    हवा पावसाळी उदास उदास तरी कुसुम उधळे सुवास सुवास जिथे रम्य संध्या पहाट दुपार निशा मस्त तेथे झकास झकास जसा धावणारा जळात तरंग तसा भावनेचा प्रवास प्रवास उडाया झुलाया खुले घरदार तिथे पाखरांचा निवास निवास म्हणे कोण तृष्णा तहान तयास किरण चुंबणाऱ्या दवास दवास लढे जो कराया स्वतःस स्वतंत्र करे कैद कैसा खगास खगास वृत्त…

  • भाग्यशाली फणी – BHAAGYASHAALEE FANEE (fortunate comb)

    साद घाली कुणी सुनेत्रा सुनेत्रा नाव ध्यानी मनी  सुनेत्रा सुनेत्रा आसवांनी खऱ्या फळावे गळावे भावना घुसळुनी सुनेत्रा सुनेत्रा प्रेम होते जरी कसे ना कळाले मिळव ते देउनी  सुनेत्रा सुनेत्रा सर्व काही तुला मिळाले उशीरा पण तरी हो ऋणी  सुनेत्रा सुनेत्रा पूर्व पुण्याइने मिळाली क्षमेची भाग्यशाली फणी  सुनेत्रा सुनेत्रा मेघ गातीलही अता पावसाळी शब्द हे वर्षुनी …

  • वीसचौदा – VEES-CHOUDAA (year 2014)

    आले नव्या क्षणांचे दमदार वीसचौदा ठोकेल पार क्षितिजी षटकार वीसचौदा गेले खिरून झरुनी बिंबात वीसतेरा गाठून मंगळाला येणार वीसचौदा हृदयास शुभ्रवर्णी छेडून तार जाता रंगात लक्ष सुंदर भिजणार वीसचौदा नाचे मयूर रानी फुलवून मोरपीसे त्यातील पीस आहे अलवार वीसचौदा काटे किती जुने ते असुदेत टोचणारे काढून त्यांस जखमा भरणार वीसचौदा फुलपाखरी मनाची स्वप्ने खरी कराया…

  • सरेल रात गात गात – SAREL RAAT (night will over)

    भिजेल चिंब चांदण्यात सरेल रात गात गात नवीन सूर्य उगवताच सरेल रात गात गात जुने नवे स्मरून प्रेम बुडेल हृदय पूर्ण त्यात खिरेल नीर लोचनात सरेल रात गात गात हसेल पूर्व अंबरात झरेल नाद मंदिरात झुलेल वात पाळण्यात सरेल रात गात गात खगास जाग येत येत घुमेल शीळ वाटिकेत सुगंध भोर सावल्यात सरेल रात गात…

  • आत्म परीक्षण करण्यासाठी – AATM PARIKSHAN KARANYAASAATHEE (for taking self test)

    आत्म परीक्षण करण्यासाठी दिवस आजचा पुरेलका आत्म परीक्षण करण्यासाठी नयनी पाणी भरेलका जगण्यासाठी हवेच मीपण मरण्यासाठी कर तू तू आत्म परीक्षण करण्यासाठी इतुके मीपण पुरेलका तर्क लावुनी मिळेल उत्तर असेल जर तो प्रश्न खरा आत्म परीक्षण करण्यासाठी प्रश्न उत्तरी झरेलका जिंकशील जर करुन परीक्षा दुसऱ्यांमधल्या न्यूनांची आत्मपरीक्षण करण्यासाठी आज अहंपण हरेलका अर्थ जाणण्या आत्मबलाचा नाम…

  • तूच शोध आज चूक – TOOCH SHODH AAJ CHOOK (find your own mistake today)

    तूच शोध आज चूक तापवून आज भूक सांग फरक बघ म्हणून पोपटास आज शूक लूक काज शिवण टिपण लाव बटन आज हूक कर्म निर्जरा करून गाठलेस आज टूक गुच्छ हा बुके म्हणेल पुस्तकास आज बूक वृत्त – गाल, गाल, गाल, गाल.

  • हायहिल्स – HAAYHILS(HIGH HEELS)

    हायहिल्स ती घालुन तेव्हां चालायाची टेचातं कधी न गजरा आणि फुलांना माळायाची केसातं ऐकत राही प्रश्न जरी ती उत्तर देई मौनातं नयन झुकवुनी भल्याभल्यांना पाडायाची पेचातं गर्द दुपट्टा सावरीत कधि पायघोळ ती मॅक्सीतं नित्य लपेटुन मोहक साडी भिजे श्रावणी मेघातं रंग सावळा खुलवण्यास ती क्रीम लावुनी गालांसं गुलबक्षीसम अधर मुडपिता वीज सळसळे देहातं भाग न…