-
सत्यशोधन – SATYA-SHODHANASATHI (for finding the truth)
भरड पिठाची, केली पोळी, सत्यशोधनासाठी मी कर्मांची, केली होळी, सत्यशोधनासाठी नीटनेटके, रचुन स्मृतींना, बांधियले प्रेमाने जळी बुडविण्या, केली मोळी, सत्यशोधनासाठी अहंकार अन, मिथ्यात्वाचे, करुन वस्त्रगाळ चूर्ण सहज फेकण्या, केली गोळी, सत्यशोधनासाठी मत्त वासना, तुडवुन पायी, जुळवुन दो हातांना ओंजळिची मी, केली झोळी, सत्यशोधनासाठी एकएकटे, कषाय गाठुन, कत्तल करण्यासाठी देवगुणांची, केली टोळी, सत्यशोधनासाठी मात्रावृत्त(८+८+१२ =२८ मात्रा)
-
कातरवेळी – (“In the twilight hour”)
धगधगत्या अग्नीत तावुनी, शुध्द जाहले! असत्यास मी, ठार मारण्या, सिध्द जाहले! वसुंधरेवर, जीवन फुलण्या, प्रपात असुनी; धबाबणारा! शृंखलेत मी, बध्द जाहले! सुरभित शीतल, लहर असोनी, बघुन भडाग्नी; हपापलेला! क्षणभर चंचल, क्रुध्द जाहले! तन मन कणखर, बंध अनामिक, तोडण्यास मी; कर्म जाळले! कातरवेळी विध्द जाहले! सांजवात लावून अंतरी, बघत राहिले… समाधीत मम, रमण्यासाठी, बुध्द जाहले! मात्रावृत्त…
-
भीत नाय मी कुणास – BHEET NAAY MEE KUNAAS (“I am not afraid of anyone”)
सोक्ष मोक्ष लावण्यास भीत नाय मी कुणास पूर्ण सत्य सांगण्यास भीत नाय मी कुणास लोटुनी पुरात नाव लाट पोट फाडण्यास भोवऱ्यास भेदण्यास भीत नाय मी कुणास कुंडल्या बनावटी करून कैक छापतात त्या चुलीत जाळण्यास भीत नाय मी कुणास माझियात मनुज देव हडळ भूत राक्षसीण हे त्रिवार बोलण्यास भीत नाय मी कुणास मंगळात आगडोंब सांगता कुणी…
-
‘मी’पण ‘तू’पण – ‘MEE’PAN ‘TOO’PAN ( me too you too)
-
प्रात्यक्षिक – PRATYAKSHIK (practical)
कुणी कुणावर प्रयोग करिती स्वार्थ साधण्यासाठी स्वार्थातच परमार्थ पाहती टोक गाठण्यासाठी प्रात्यक्षिक हे फक्त असावे जीवाला जपण्या बरे न पिळणे इतुके कोणा भोग भोगण्यासाठी शब्द आंधळे पाडत जाता चरे काळजाला संयम अपुला येतो कामी लेप लावण्यासाठी पाउलवाटा झाल्या दर्शक घाट चढायाला मार्ग बनविती स्पर्धक सारे फक्त धावण्यासाठी बाईपण मम मौन जाहले कुचकट शेऱ्यांनी फक्त एकदा…
-
एकमेका सावरू – EKAMEKA SAVARU (“let’s support each other”)
बोचरी थंडी हिवाळी शीळ घाली पाखरू वारियाने वस्त्र उडता स्वप्न माझे पांघरू काचता दावे गळ्याला उखडुनी खुंटी तिची माळरानी धाव घेते धुंद अवखळ वासरू दाटते आभाळ जेंव्हा मौन घेते ही धरा वीज येता भेट घ्याया खडक लागे पाझरू पाहण्या उत्सुक असे मी मुग्धतेतिल गोडवा पावसाळी वादळाने तू नकोना बावरू फेक ती काठी ‘सुनेत्रा’ गावयाला मोकळे…
-
मौक्तिक – MOUKTIK (pearly)
गुलबक्षीचा, रंग ल्यायल्या, गालांवरती, मीनाकृतिसम, नयनांमधले, अश्रू भरले, टपोर मोती, उधळुन देऊ, मुक्त मनाने! नेणीवेतिल, विस्मरणातिल, वा स्मरणातिल, कर्मफळांतिल, कठिण कवचयुत, कटू बियांची, भरून पोती, उधळुन देऊ, मुक्त मनाने! हिरे माणके, पुष्कराज अन, मौक्तिक पाचू, याहुन तेजोमय रत्नत्रय, अंतर्यामी, ज्या रत्नांच्या, त्या रत्नांच्या, वेलीवरची; दवबिंदूसम, निर्मळ दुर्मिळ, खुडून पुष्पे, पानापानावर हृदयाच्या, काव्यामधुनी, जपली होती, उधळुन…