Tag: Marathi Ghazal

  • अहिंसा – AHINSAA (nonviolence)

    सदैव असुदे मनात माझ्या प्रीत अहिंसा खरी अनेकांतमय सत्यासाठी जीत अहिंसा खरी सम्यग्दर्शन ज्ञान मिळविण्या जीव साधना करी चारित्र्याच्या घडणीसाठी रीत अहिंसा खरी मुक्तक- मात्रा सत्तावीस=(आठ+आठ+आठ+तीन), २७=८+८+८+३

  • उकार – UKAR (U vowel sign)

    हसण्याचे किती प्रकार सुंदर पाहुनी लिहिती हुशार सुंदर कशास घुसळुनी मिळते लोणी कुलूपबंद कर विचार सुंदर दशधर्मातील सहा पुरवण्या शोधा त्यातील नकार सुंदर स्वगतामधूनी मुक्त व्हावया ज्योत समईची रफार सुंदर पंचमेरूचे शिखर गाठण्या वेलांटीयूत उकार सुंदर मात्रा -सतरा=( नऊ+आठ), १७=९+८

  • मोक्ष – MOKSH (salvation)

    पुरे जाहली, अता परीक्षा, मोक्ष हवा मज, मोक्ष हवा लपले त्यांना, देण्या शिक्षा, मोक्ष हवा मज, मोक्ष हवा मुला-फुलांना, सुखी ठेवण्या, प्राणपणाने, लढेन मी सत्य जाणण्या, उपाय दीक्षा, मोक्ष हवा मज, मोक्ष हवा बांध घालण्या, स्वैरपणाला, हवेच शासन, धर्माचे प्रत्येकाला, सुंदर कक्षा, मोक्ष हवा मज, मोक्ष हवा जपती सारे, जीव जिवांना, हाच स्वर्ग रे, असे खरा…

  • संगर – SANGAR (war)

    स्वर्गीय सावळे मंदिर श्रावण आभाळ पेलते संगर श्रावण झोकात चालल्या ललना मोहक घाटात पाहण्या झुंबर श्रावण सांजेस सावळी पणती तेवत कानात बोलते मंतर श्रावण श्रद्धेस, आंधळ्या, नजरा डसता अंधार फोडतो कंकर श्रावण ज्येष्ठात रंगता गायन वादन आषाढ संपता नंतर श्रावण वृत्त- गा गा ल, गा ल गा, गा गा, गा गा.

  • करेल ज्योत दीपदान – KAREL JYOT DEEP DAAN (offering of an illuminated lamp)

    कराच आज दीपदान स्मरून शुद्ध दीपदान प्रसन्न मंदिरात मूर्त करेल ज्योत दीपदान तुझे किती सतेज मौन ठरेल प्रीत दीपदान मला दिसे फुला-फळात पराग बीज दीपदान अवस पुनव जरी असेल सुनेत्र आम्र दीपदान वृत्त – ल गा, ल गा, ल गा, ल गा ल.

  • पहाट गाणे – PAHAT GANE (song of dawn)

    भाळावरी नभाच्या, पूर्वेस चंद्रकोर; जाळीतुनी ढगांच्या, हसते सकाळ भोर. गाई भारद्वाज, त्याचे पहाट गाणे; फुलली प्रभात हसरी, नाचे मनात मोर.. चारोळी-मात्रा,तेवीस(२३)

  • तुटले कधीच नाही – TUTALE KADHICH NAHEI (never broken)

    मी गोठले तरीही फुटले कधीच नाही अन तापले तरीही विरले कधीच नाही टाळून अडथळ्यांना वेगात धावताना ध्येयास गाठले पण पडले कधीच नाही बागेतल्या फुलांचा भरला सुगंध हृदयी सौंदर्य प्राशिताना ढळले कधीच नाही भव-सागरात वेडी उडवून लाट जाता काठावरीच आले बुडले कधीच नाही मिटवून इंद्रियांना मी ताणता मनाला आले नभात फिरुनी तुटले कधीच नाही मोडून लाज…