-
कुळाचार – KULACHAR
कुठे तार नाही खुला पार नाही बसू आज कोठे खरा यार नाही लगावून द्याया नवा वार नाही कसे गोत्र नक्की कुळाचार नाही न गारा न वर्षा धुवाँधार नाही खुराड्यात लोळे नभी घार नाही “सुनेत्रा”स बंदी असे दार नाही
-
अनवट – ANAVAT
अनवट कोडे मृदुल उकलले उकलीमध्ये अजून काहीं अनवट अनवट नाताळातिल शेकोटीची धूसर चाहुल दिशांत दाही अनवट अनवट वक्र स्वभावी सरळ जाहले बिळात शिरण्या बीळच फुटले जळी चिंबले त्यांस तपविण्या शिशिरामधले ऊन हिवाळी त्राही त्राही अनवट अनवट शुद्धात्म्याला फक्त पूजिती गुणानुरागी नाव असूदे काहीपण मग देह दिगंबर जिनवर ब्रम्हा आदम येशू ईश इलाही अनवट अनवट विहिरीतिल…
-
बेट – BET
रसाळ बेट बेरकी इरा गुणानुरागिणी सुजाण चाट जाहले तऱ्हा गुणानुरागिणी करात पुष्प मोगरा वळून ताल नर्तनी न पावलात वक्रता हिरा गुणानुरागिणी कमाल रोजचीच ही किमान बोलणे जरी उलून अंकुरा भरे धरा गुणानुरागिणी रुबाबदार नर्तकी नुपूर वाजती झणी सहज ध्वजेस पेलते धुरा गुणानुरागिणी सुशांत समय गारवा हवेत सत्य लहरते सुवर्ण नीर निर्झरा कऱ्हा गुणानुरागिणी
-
नरद – NARAD
रुबाई … घेतात विसावा गुरे वासरे गाई डोळ्यात दाटते हिरवी कुरणे राई हा निसर्ग देई दान इथे अन तेथे हा शांत मनाच्या पार इथे अन तेथे गझल … नरद कसे फिरवशिल नरद पटावर बुद्धीबळाच्या बोल विकून चिक्की नक्की बिक्की चाली तुझ्या तू टोल मिरवायाला मोठेपण बघ घाई किती रे तुझी कुणी न उत्सुक उरली प्यादी…
-
धात्री – DHATRI
तीन रुबाया एकल… वड्यास एकल कधी न खावे खावे पावासंगे नाहीतर मग युद्ध प्रकृती कफ पित्ताचे रंगे छातीमधुनी घशात येता खोकुन खोकुन ठसके लसुण पाकळ्या चावुन खाव्या कोमट पाण्यासंगे दवांई … हरित पीत अन श्वेत कफाने वात आणला बाई वैद्यांचा मग घे तू सल्ला सत्त्वर कर घाई छातीमध्ये न्युमोनियाची जाळीवर जाळी टाळशील जर पथ्य दवांई…
-
जिनप्रतिमा – JIN PRATIMA
दोन रुबाया जिनदेव … रुबाईची लय पकडून झरते झरझर अक्षर गाणे जिनदेव अंतरी वसे दिगंबर जगण्या स्वतंत्रतेने कशास शोधू देव काष्ठी अन जळी स्थळी पाषाणी झरझर झरती भूमीवरती माझी अक्षरगाणी जिनप्रतिमा … या ब्रह्मांडाचा धर्म अहिंसा जिनानुयायांचा मम देहच अवघा झाला आहे जिनमंदिर सांचा अंतर्यामी जिनप्रतिमा स्थित नित्य दर्शनासाठी जिनवानी ज्ञानामृत पाजे सत्य पंच परमेष्ठी
-
सोवळे – SOVALE
दोन रुबाया स्वातंत्र्य… स्वातंत्र्य प्रिय मज अम्हा तुम्हा हर जीवा ना मात्रा अक्षर अडकविती मम जीवा संपले प्रश्न हे गूढ मूढ छळणारे व्हावयास राख पाप कर्म जळणारे सोवळे… सोवळे उतरवलेय ओवळे नेसायाला का लाऊन घ्यावे अंगा वल्कल नेसाया नेसते रुबाई नऊवार पैठणी इरकल खांद्यावर शाल गझल जणु ढाक्याची मलमल