-
गॅलरी – GALAREE(GALLERY)
काल मी लिहिलेच नाही वासरीत काही विसरले करण्यास नोंदी डायरीत काही पसरले कडधान्य देण्या ऊन छान वारा पाखरे आलीत टिपण्या ओसरीत काही कोसळे पाऊस धो धो अंगणात दोरी घातले सुकण्यास कपडे गॅलरीत काही आज मी गाऊन भरते ओंजळीत गाणे शोधुनी हुंकार अडले पावरीत काही माझिया ओठात येता बहर गालगागा कागदावर उतर गझले सावरीत काही
-
चूर्ण – CHOORN
ग़ज़लेवरती गझल लिहाया गझल पुन्हा झाले गझलेला मम दाद द्यावया तरल पुन्हा झाले विडंबनाची व्याख्या शोधुन विडंबने लिहिली विडंबनासम वक्र होउनी सरल पुन्हा झाले परिमल खोडुन परिमळ लिहिले मागे मी गेले काफियास टाळाया सवती कमल पुन्हा झाले कवितांच्या मी गझला केल्या गझलांच्या कविता काव्य त्यातले जपण्यासाठी सजल पुन्हा झाले स्वतःस वाटुन मी पाट्यावर चूर्ण मऊ…
-
वनभृंग – VAN BHRUNG
घनदाट कुंतलावरी कृष्ण तव लिहिल्या श्यामल गझला मीही वनभृंग जणू तव नयनांवर दो लिहिल्या निर्जल गझला मीही भिजवून भावना दवबिंदूंनी पिंपळ पानावरती सुकल्या मम् जुनी लेखणी झरझर फिरवुन लिहिल्या मंगल गझला मीही मनमोर नाचता मेघांच्या छायेत फुलवुनी पूर्ण पिसारा आसूड मेघनेमधून ओढत लिहिल्या चंचल गझला मीही भरभरुन ओंजळी उधळत मोती जलद गर्जता आभाळातुन तापून कावल्या…
-
बँक – BANK
तरही गझल गझलेची पहिली ओळ कवी राज पठाण यांची साऱ्याच नाटकांचा होणार अंत आहे कोणी न पोर येथे कोणी न संत आहे देऊळ भंगलेले वेदीवरी न मूर्ती तेथे भुजंग ज्याची कीर्ती दिगंत आहे आत्माच बँक माझी येथे कळ्या सुगंधी होतात शब्द यांचे संख्या अनंत आहे वाऱ्यास नाचऱ्या मी हृदयात कोंडल्यावर हुंकारतो असा तो जैसा सुमंत…
-
आत्महितैषि – AATM HITAISHEE
… गागाल गागाल हे अखरब साठी सुरुवातीला सोपे लिहुया अवघड ना गण गागालगा गागागा हे अखरम साठी आरंभाला गाललगा च्या सारखेच हे ग ललगागा … आत्महितैषि बरसावे मी श्रावणातल्या ढगासमान रिते रिते मी व्हावे उडण्या खगासमान प्रेम वसे मम हृदयी सम्यक आत्महितैषि जन रीती पण पाळाव्या मी जगासमान
-
वाईन VAAEEN
चषकात ओतलेले रंगीत पेय आहे दारू नका म्हणू तिज हा शब्द हेय आहे वाईन रंग दिसतो पण ही सुरा नव्हे हो आनंदकंद रमणी मम गझल गेय आहे कर्मे करून जगणे घडणे तुझ्याच हाती करशील कर्म त्याचे तुजलाच श्रेय आहे नावावरून पारख करणे कधी न बरवे कोणास तो गणाधिश कोणा अमेय आहे आत्म्यात देव वसतो नावास…
-
देवनागरी – DEV NAAGAREE
देवनागरी लिपी मराठी माझ्या हाती सुंदर काठी कन्नड हिंदी इंग्रजीतही गरगर फिरते माझी लाठी अवघ्या ब्रह्मांडात फिराया धन शब्दांचे माझ्या गाठी चिरतारुण्याचा वर मजला उलटूदे पन्नाशी साठी भिऊ कशाला बोलायाला निसर्ग ईश्वर माझ्या पाठी