Tag: Marathi Ghazal

  • ललाल लाल लालला – LALAAL LAAL LAALALAA

    मनातल्या मनात गा ऋतूंसवे भरात गा उनाड ऊन्ह कोवळे म्हणे फुलांस वात गा सुरेल गीत मोकळे सुसाट वारियात गा नभात वीज नाचता धुमार पावसात गा खुमारदार सावळ्या नशेत चिंब न्हात गा भरून प्रीत अंतरी टिपूर चांदण्यात गा जगून भरभरून घे मिळेल साथ हात गा बनून पाखरू निळे गुलाब ताटव्यात गा ललाल लाल लालला स्वरात भीज…

  • रोमिओगिरी – ROMIO GIREE

    मस्त रोमिओगिरी जिवास भावली मौन अक्षरांस चांदण्यात भावली धन्यवाद देत लेखणी झरे फळे पावले तिची खऱ्या जगास भावली कारणाविना खुषी भरून वाहते प्राण बोलतोय गझल गाज भावली त्याग शब्द मोह सांगते मला कुणी त्यातली नशा निखारदार भावली फॉरवर्ड धाडणे बसून बास रे गोष्ट अंतरातली फुलास भावली गझल अक्षरगणवृत्त (मात्रा २०) लगावली – गाल गाल/ गाल…

  • गोल्ड – GOLD

    चषकात टी नशीला बर्फाळ कोल्ड आहे तुज मद्य वाटले पण हा ताज गोल्ड आहे घे रेसिपी लिहूनी मी सांगते तशी तू थांबू नको जराही सय खूप ओल्ड आहे अक्षर टपोर झरते जणु माळ मोतियांची हातात झिंगलेला रेनॉल्ड बोल्ड आहे जालास फाडुनी ज्या ते ठिगळ लावताती जालावरी महा त्या अमुचाच होल्ड आहे जाऊ नको तिथे तू…

  • गोमटसार – GOMAT SAAR

    फांदीवरती पोपट फार हलवे फांदी फोगट नार गोम्मटरायाच्या साठीच गुरुने लिहिले गोमटसार गझल औषधी काढा लाल धरण्या भाळी कोमट धार आम्रतरूच्या घन छायेत मस्त उन्हाळी खोपट गार प्रतिभा साकी ज्या खोलीत नाव तिचे रे सोमट बार धारदार जरी शस्त्र तुझे हात करे तव बोथट वार बळे कुणाच्या न गळा पडे ‘सुनेत्रा’ न ही लोचट हार…

  • की पर्सन – KEE PARSAN (KEY PERSON)

    कुलुपांसाठी किल्ल्या बनवे की पर्सन मी मोह न मजला कुठला झुकवे की पर्सन मी कलम फिरवुनी कड्या उचकटे उखडे झटपट अजस्त्र टाळा खोलुन हलवे की पर्सन मी टाळ्याला अभिषेक घृताचा वेदीवरती मनोज्ञ दर्शन भक्तां घडवे की पर्सन मी शांती तृप्ती मिळण्या जीवा कैक प्रकारे मंदिरातली घंटा बडवे की पर्सन मी चोरांच्या उलट्या बोंबांना बुकलून छान…

  • दाम कुणी दाविला – DAAM KUNEE DAAVILAA

    हात उगारून जरी घाम कुणी दाविला हास बरे गोड जसे दाम कुणी दाविला आम्रतळी गीत खुजे त्रस्त करी जेधवा उंच उभा वृक्ष नभी पाम कुणी दाविला भाळ शिरी नित्य कधी शूळ उठे तेधवा भरुन कुपी जर्द धमक बाम कुणी दाविला दाम तयां खूप मिळे कष्ट करोनीच रे दाम मिळायास परी काम कुणी दाविला द्वाड मुला…

  • गझल गाज – GHAZAL GAAZ

    रथास अश्व सात जोडलेत तयात सूर्यदेव बैसलेत समुद्र कुंचल्यास फिरवतोय निळ्या नभास स्वर्ण वर्ण देत उधाणलेय नीर तप्त लाट नमेन त्यास ओंजळीत घेत निसर्ग धुंद रंग उधळतोय सुगंध लहर दौडते हवेत निवांत ऐक गीत गझल गाज प्रसन्न ऊन्ह कोवळे नि रेत गझल अक्षरगणवृत्त (मात्रा १६) लगावली – लगाल/गाल/गाल/गाल/गाल/