-
याड – YAAD
याड असूदे झाड असूदे जपू तयाला ताड असूदे माड असूदे जपू तयाला पोर असूदे अथवा प्राणी घे सांभाळुन गोड असूदे जाड असूदे जपू तयाला मोहर येता आम्रतरुवर राखणीस जा कैरी अथवा पाड असूदे जपू तयाला वेल वाहते भार फुलांचा खोड तिचे मग नाजुक अथवा जाड असूदे जपू तयाला जल भरलेली निळ्यासावळ्या आठवणींची मोळी अथवा बाड…
-
पानगळ – PAANGAL
मनात माझ्या दडले होते स्वप्न मला ते पडले होते जरी संकटे धावुन आली मनासारखे घडले होते स्वतः स्वतःवर केली प्रीती प्रेम स्वतःवर जडले होते पहात होते मी खिडकीतुन उंबऱ्यात ते अडले होते पानगळीचा ऋतू सुखाचा पान पान मम झडले होते जिवंत होती मैनाराणी पंख तिचे फडफडले होते सांग प्रियतमा सुंदर सुंदर रूप कुणाला नडले होते…
-
फुकनी – FUKANEE
चिमटा झारा फुकनी असुदे माय मोडुनी कलम बनविते कोंड्याचा ती मांडा करुनी घास पिलांच्या मुखी भरविते कधी चाक तर कधी अश्वही कधी सारथी माय होतसे चाबुक हाती घेत विजेचा संसाराच्या रथा पळविते आय बाय वा अम्मी मम्मी अनेक रूपे माय वावरे आईची ती आऊ होउन ताक घुसळते तूप कढविते बोट धरोनी शाळेमध्ये वेळेवर बाळांना नेते…
-
अत्तर – ATTAR
फुलात असतो सुगंध जो तो कुपीत भरता होते अत्तर प्रियतम माझा माझ्या संगे प्रीत तयावर माझी कट्टर फुले बाल अन तरुण साजिरी सुकल्यावरती अपसुक गळती त्यांना नसते वृद्धावस्था साठी आणिक वय बिय सत्तर सप्तरंग धाग्यात भरोनी एक सुबकशी विणून पिशवी वह्या पुस्तके मोरपिसे मी तयात भरता होते दप्तर पाषाणाला ठोक ठोकुनी शिल्पी छिन्नीने घडवीता देव…
-
गाठ – GAATH
दशधर्माचे दे रे पाठ चुकांवरी तू मारुन काट वर्षे काही थोडी छाट निवृत्तीचे वय ना साठ कधी न दुखते माझी पाठ मी तर असते सदैव ताठ प्रेमाचा मी चढले घाट साय सुखावर आली दाट कुणी न अडवी माझी वाट स्वागतास दो आले काठ माझ्या पायी झुकते लाट अंतरात ना माझ्या गाठ पक्वान्नाने भरले ताट शुद्ध…
-
वेष्टन – VESHTAN
सारे नकली नसते सखये वेष्टनातले काही सुंदर असते सखये वेष्टनातले वेस्टन आणिक वेष्टन यातील फरक जाणता निर्मळ अन्तर हसते सखये वेष्टनातले झाकपाक तू करशिल किती ग उघड पुस्तका हिरमुसुनी मग बसते सखये वेष्टनातले अग्नीमध्ये झोकुन देउन झळाळण्याला कमर स्वतःची कसते सखये वेष्टनातले पारखून तू हरेक वस्तू धाड वेस्टनी नाहीतर मग फसते सखये वेष्टनातले गझल मात्रावृत्त…
-
कायबाय – KAAY-BAAY
अता कशास बोलणे लिहेन कायबाय मी लिहून गझल पावसा स्मरेन कायबाय मी कुणास काय वाटले कुणास काय टोचले नकोच हृदय सोलणे विणेन कायबाय मी तशीच सांज ती दुपार भांड भांड भांडणे तशी पहाट यावया रचेन कायबाय मी कितीक रंग ईश्वरा तुझे नभात सांडती तसेच रंग उगवण्या पुरेन कायबाय मी अनाम ओढ लागता तुझेच नाम जिनवरा…