Tag: Marathi Ghazal

  • धर्मगती – DHARM-GATEE

    खडका दे लाटेस मती येण्या जाळ्यात ती रती हिरवा पाचोळा उडता चंचल हरिणी बावरती काढ असे तू चित्र अता सरिता तो अन सागर ती संकटात ना डगमगते कणखर पण भावूक सती असो दैत्य वा देवरुपी मुक्त करे मज धर्मगती गझल मात्रावृत्त (मात्रा १४)

  • ओघळ – OGHAL

    अंडाकृति तव प्रिये चेहरा खरबुज वर्णी नीतळ सुंदर कृष्ण कुंतली तुझ्या विपुल घन नेत्रबाण दो सावळ सुंदर पहाट होता वेलींवरल्या पुष्प-पऱ्यांच्या नयनांमधुनी झरती रिमझिम धवल सुवासिक दवबिंदुंचे ओघळ सुंदर पौष पौर्णिमा नेसुन येता निळी पैठणी हरित धरेवर शिशिरामधल्या चांदणराती चिंब भिजावा कातळ सुंदर जुन्या जांभळ्या लुगड्यावरती जोडुन तुकडे चिटा-खणांचे पणजी माझी शिवायची नवी रंगबिरंगी वाकळ…

  • गुलाबझारी – GULAAB-ZAAREE

    जलौघवेगा धबाबणारी धरेवरी या जलौघवेगा नभास भारी धरेवरी या मिळावयाला जिवास मुक्ती जळी समुद्री जलौघवेगा करेल वारी धरेवरी या खळाळणाऱ्या रुपात सुंदर सदैव वाहे जलौघवेगा सुडौल नारी धरेवरी या झळाळणाऱ्या तळ्यात कमळे फुलावयाला जलौघवेगा गुलाबझारी धरेवरी या विडे बनविण्या लवंग खुपसुन खरी सुकन्या जलौघवेगा कुटे सुपारी धरेवरी या गझल- अक्षरगण वृत्त (मात्रा २४) लगावली –…

  • जरतार – JARATAAR

    लुगडं हिरवं हिरवं गार नेसली बयो लुगडं झक्क नऊ वार नेसली बयो स्वच्छ पान घाटदार देह नेटका लुगडं तलम काळंशार नेसली बयो लाल काठ पीत पदर मधुर भाषिणी लुगडं निळं जाळीदार नेसली बयो लेखणीच खड्ग शस्त्र जात भुताची लुगडं नंदू जरतार नेसली बयो लांछनास सुकर वृषभ टिळा चंदनी लुगडं सात अब्ज भार नेसली बयो जीवाला…

  • शो – SHO

    चेहरा हरवला आहे कुणाचा त्यातला जो आहे खरा चेहरा घडवला आहे कुणाचा त्यातला तो आहे खरा भाबडा रचयिता होता जरी रे गुंतला का गोष्टीमधे चेहरा भिजविला आहे कुणाचा त्यातला हो आहे खरा गाजरे पिकविली जी तू गुलाबी गोडशी त्या रानामधे चेहरा लपविला आहे कुणाचा त्यातला भो आहे खरा बावरी प्रियतमा गोरी कुणाला घाबरे ही सांगा…

  • करतळ – KARATAL

    पाचोळा अन हिरवळ भूवर आठवणींचा दरवळ भूवर तव पदराची सळसळ भूवर कुणा वाटते मृगजळ भूवर किणकिणणारी कांच कंकणे जणू झऱ्याची खळखळ भूवर मृणाल कैसी फसेल चिखली उमटव उमटव करतळ भूवर नाच ‘सुनेत्रा’ जलदांमधुनी झरण्या मौक्तिक घळघळ भूवर गझल मात्रावृत्त – १६ मात्रा

  • नाकी नऊ – NAAKEE NAOO

    माझे मन माझे तन जपे आठवांचे क्षण वारियाने हलतात जणू दाटलेले घन जसे फांदीवर पुष्प तसे मुक्त माझे मन शीळ घालतोय वात शहारते सारे बन सुगंधीत रान मस्त मातीचाया कणकण नाकी नऊ आणेन सोड तुझा मूढे…पण आत्मरुप संपदेचे सुनेत्रात सारे धन गझल मात्रावृत्त – १२ मात्रा