-
स्थापना – STHAPANA (FOUNDED IN)
वर्णमातृकेतिल स्वर सारे जमले सजले तबकामध्ये विरामचिन्हांचे दवबिंदू शुभ्र सांडले तबकामध्ये दहा दिव्यांनी उजळुन जाता दहा दिशातिल अनंत वाटा स्वरात मिसळुन व्यंजनाक्षरे शब्द उमलले तबकामध्ये नीर सुगंधी अक्षत पुष्पे काव्यशर्करा अंतर दीपक धूप चंदनी श्रीफल कळसा नीटस भरले तबकामध्ये केशर हळदी कुंकुम वर्णी तिलक रेखुनी मम भाळावर बिंबाचे प्रतिबिंब सुदर्शन झुकुन घेतले तबकामध्ये पंचपरमपद परमेष्ठींचे…
-
महती – MAHATEE (IMPORTANCE)
हित मित प्रिय अन सत्य गुरूची वचने टिपते मी दशधर्माची महती कळण्या कवने रचते मी ऊद धूप कर्पूर जाळुनी लावुन दीप दहा प्रकाश आणिक परिमल यांनी भवने भरते मी पूर्वभवांच्या उकलुन गाठी धागा सरळ मिळे असले धागे धुते सुकविते वसने विणते मी ध्यानाग्नीने राख व्हावया निजगत कर्मांची जिनाबिंबा अंतरी स्थापुनी नयने मिटते मी काव्यफुलांची ओंजळ…
-
जान – JAAN (LIFE)
-
डोरले – DORALE (ORNAMENT)
पर्व दशलक्षण दिगंबर जैनियांचे थोरले मी त्याचसाठी भावनेतिल अर्थ सुंदर खोरले मी साधका आत्माच साधन शुद्ध निर्मल जाणल्यावर मम मनाच्या आगमातिल शब्द दडले चोरले मी भूक्षमा अन मार्दवादी धर्म दाही पाळणाऱ्या भूतकालिन मुनिवरांचे शिल्प दगडी कोरले मी भक्तिपूर्वक अष्टद्रव्ये अर्पिल्यावर जिनप्रभूला शांतता मजला मिळाली झोपल्यावर घोरले मी ज्ञान श्रद्धा शील सम्यक पाच शेरांची गझल ही…
-
अंधश्रद्ध – ANDH-SHRADDH (SUPERSTITIOUS)
पराधीन होतो प्राणी कर्मबद्ध होतो कर्म रोखुनी जाळूनी तोच सिद्ध होतो सहज मैत्र जुळते जेव्हाअहं गळुन जाई द्वैत संपुनीया जाता भाव शुद्ध होतो पाच पांडवांची पत्नी एक द्रौपदी हो सत्यकथा याला म्हणता धर्म क्रुद्ध होतो आत्महिता जपण्यासाठी जीव दक्ष सैनी परहित पण करता तपता बंध वृद्ध होतो पंथवाद प्रिय भोग्यांना जाण मानवा तू मनुज क्षुद्र…
-
जगण्याची रे गंमत घे – JAGANYAACHEE RE GAMMAT GHE (DEAR FRIEND..ENJOY THE LIFE..)
असो चाळिशी वा पन्नाशी जगण्याची रे गंमत घे साठी बुद्धी नाठी खाशी जगण्याची रे गंमत घे विशीतल्या गुजगोष्टी स्मरुनी काव्य प्रीतिचे नवे रचू घड्याळ बांधू बारा ताशी जगण्याची रे गंमत घे सम्मेदाची यात्रा केली श्रवणबेळगोळा गेलो कशास आता हाजी काशी जगण्याची रे गंमत घे रानपाखरांसंगे गाऊ हस्ताच्या धारेत भिजू रानी डुलते कंच कपाशी जगण्याची रे…
-
आत्माजीराव – ATMAJI RAO (DEAR TO THE SOUL)
आल्या ग नाचत पाऊस धारा आश्विनासंगे वाजवी पावा रानात वारा आश्विनासंगे सोवळे नेसुन जानवे घालुन मंत्रास बोले उपाध्या गुरुजी शोभतो तारा आश्विनासंगे देहात मौनी बैसला आहे आत्माजीराव गावया अधीर फोडून कारा आश्विनासंगे मातीस ओल्या आकार देण्या हस्त हे माझे पाडण्या बुंदी धरतात धारा आश्विनासंगे काव्यात झरझर नाव गुंफाया कवयित्री तुझे शाईचा गाढ उतरेल पारा आश्विनासंगे…