Tag: Marathi Ghazal

  • घोळ – GHOL (SCAM)

    माझिया पिंडात जे जे तेच ब्रह्मांडात रे कांडले शब्दांस कारण निर्मिती कांडात रे तू सुपारी घेतली अन घाव घालुन फोडली गुण सुपारीचेच अवघे जाण या खांडात रे मुसळ ना केरात जाते मुसळ हे माझे उभे म्हण नको शब्दात पकडू घोळ थोतांडात रे मागते जिव्हा म्हणोनी मांस खाण्या माणसा मूक प्राण्या मारिशी तू जीव बघ सांडात…

  • पानाभवती – PAANAA BHAVATEE (AROUND THE LEAF)

    छुमछुम छुमछुम पैंजण वाजे पानाभवती उदक सुगंधी दवबिंदूंचे पानाभवती पदन्यास कलिकांचे पाहुन दिशा उजळता कुंदफुलांसम गझल डोलते पानाभवती चिंब वल्लरी हळद माखली फुले सुगंधी परिमल प्राशुन वारा नाचे पानाभवती झरझर विणते घालित टाके पाऊस धार सळसळणारे अक्षर पाते पानाभवती आरसपाणी पान भुईचे तयात अपुले बिंब पाहण्या गगन उभे हे पानाभवती गझल मात्रावृत्त (मात्रा २४)

  • आरसपाणी – AARAS-PAANEE (TRANSPERANT)

    जलद प्रकटले बिजलीसंगे मौन योगिनी सृष्टी झाली जलद जलद घन मुक्त बरसले तप्त धरेवर वृष्टी झाली जलद कृष्ण बन गडद स्मृतींचे हळू उतरले पापणकाठी जलद “सुनेत्रा” झरझर झरले आरसपाणी दृष्टी झाली

  • ललाल लाल लालला – LALAAL LAAL LAALALAA

    मनातल्या मनात गा ऋतूंसवे भरात गा उनाड ऊन्ह कोवळे म्हणे फुलांस वात गा सुरेल गीत मोकळे सुसाट वारियात गा नभात वीज नाचता धुमार पावसात गा खुमारदार सावळ्या नशेत चिंब न्हात गा भरून प्रीत अंतरी टिपूर चांदण्यात गा जगून भरभरून घे मिळेल साथ हात गा बनून पाखरू निळे गुलाब ताटव्यात गा ललाल लाल लालला स्वरात भीज…

  • रोमिओ – ROMIO

    मस्त रोमिओगिरी जिवास भावली मौन अक्षरांस चांदण्यात भावली धन्यवाद देत लेखणी झरे फळे पावले तिची खऱ्या जगास भावली कारणाविना खुषी भरून वाहते प्राण बोलतोय गझल गाज भावली त्याग शब्द मोह सांगते मला कुणी त्यातली नशा निखारदार भावली फॉरवर्ड धाडणे बसून बास रे गोष्ट अंतरातली फुलास भावली गझल अक्षरगणवृत्त (मात्रा २०) लगावली – गाल गाल/ गाल…

  • गोल्ड – GOLD

    चषकात टी नशीला बर्फाळ कोल्ड आहे तुज मद्य वाटले पण हा ताज गोल्ड आहे घे रेसिपी लिहूनी मी सांगते तशी तू थांबू नको जराही सय खूप ओल्ड आहे अक्षर टपोर झरते जणु माळ मोतियांची हातात झिंगलेला रेनॉल्ड बोल्ड आहे जालास फाडुनी ज्या ते ठिगळ लावताती जालावरी महा त्या अमुचाच होल्ड आहे जाऊ नको तिथे तू…

  • गोमटसार – GOMAT SAAR (BOOK WRITTEN FOR GOMMAT)

    फांदीवरती पोपट फार हलवे फांदी फोगट नार गोम्मटरायाच्या साठीच गुरुने लिहिले गोमटसार गझल औषधी काढा लाल धरण्या भाळी कोमट धार आम्रतरूच्या घन छायेत मस्त उन्हाळी खोपट गार प्रतिभा साकी ज्या खोलीत नाव तिचे रे सोमट बार धारदार जरी शस्त्र तुझे हात करे तव बोथट वार बळे कुणाच्या न गळा पडे ‘सुनेत्रा’ न ही लोचट हार…