-
उच्चारण – UCHCHAARAN
गरजेपुरते बोलाया उच्चारण उरले नव्हते उधारीतले श्वास घ्यावया तारण उरले नव्हते रंगपंचमी खेळायाला साजण उरले नव्हते इंद्रधनू रेखाया क्षितिजी श्रावण उरले नव्हते भूकंपाचा फेरा आला भूमीताई खचली गाई गुरांना बांधायाला दावण उरले नव्हते बाप न उरला माय न उरली घर ते भणभणलेले थांबायाचे कोणासाठी कारण उरले नव्हते सुस्त अजगरे पडून होती पण सळसळण्या तेजे इच्छाधारी…
-
गात गाणे – GAAT GAANE
सांज व्हावी मोरपंखी रात यावी गात गाणे रामप्रहरी वारियाने जाग यावी गात गाणे वेदनांचा अंत व्हावा प्रेम या जगती फुलावे मूक झालेल्या विजेची साद यावी गात गाणे चंद्र तारे सूर्यसुद्धा डोकवावा अंतरी मम मी असावे स्वच्छ ऐना प्रीत यावी गात गाणे मी जशी आहे तशी मी वागते अन बोलतेही सांगण्या हे वादळाची हाक यावी गात…
-
कोळी – KOLEE
काल पेटली दारी होळी आज मस्त पुरणाची पोळी दो प्रहरी तू येच पावसा पाडाया गारांची टोळी धारांसंगे करूत गप्पा भर-भरण्या गारांनी झोळी येता वादळ अपुल्यामध्ये त्यांस पकडण्या येइल कोळी सहाण घेऊ चंदन उगळू गुळात घोळुन बनवू गोळी येता कपटी भेटायाला मिळून चौघे बांधू मोळी गझल – मात्रावृत्त, मात्रा १६(८+८)
-
आनंद – AANAND
आनंद अज्ञानातही असतो कधी माणूस तेव्हा त्यातही रमतो कधी नाही जरी त्याला जमे झरणे पुन्हा फुलवावया वृद्धांस तो झरतो कधी शोधावया कोणा जरी फिरतो सदा माझे तरी नाही कुणी म्हणतो सदा कोणावरी केली न प्रीती सांगतो मौनातल्या बिंबात का बुडतो कधी जिंकावया निघतो जगा शस्त्रांसवे गोष्टीतल्या युद्धातही हरतो कधी खेळात आता खेळ नाही वाटता लांबून…
-
बारी – BAAREE
बाहेर तू उन्हाने होशील तप्त भारी डोक्यातल्या भुश्याची पेटेल आग सारी या शायरीत माझ्या आहेच जल सुगंधी ते शिंपडून पाणी विझवेल आग झारी क्षितिजावरून वाहे झुळझूळ शीत वारा त्याच्यासवे ढगांची आता निघेल वारी नाही कसे म्हणावे वळीवास त्या धरेने होती अधीर तीही चाखावया खुमारी घेऊन मौन ओठी तू ऐक गझल माझी आता हसावयाची अमुची असेल…
-
विसर सारे – VISAR SAARE
काळजाला थोपटावे अंथरावे वाटले तर …विसर सारे …. वापरोनी ते धुवावे वाळवावे वाटले तर …विसर सारे…. काष्ठ पत्ती वाळवीली चूल दगडी पेटवीली …भर दुपारी…. त्या चुलीवर काळजाला पेटवावे वाटले तर …विसर सारे …. सांगते ती सावजाला मी जपावे काळजाला …अंथरोनी…. मीच चालुन त्यावरी ते चुरगळावे वाटले तर …विसर सारे …. हाक ती मारीत आहे चालली…