-
हिरा – HIRAA
गेंद गोलसर कुंकू वर्णी गुलाबपुष्पांचा लाल जर्द जणु झेंडू चेंडू रुबाब पुष्पांचा घोळुन परिमल घोळामध्ये झाला गडद किती झोक जांभळा शौक गुलाबी शबाब पुष्पांचा लाचारी नच कर्तव्याचा धर्म मार्ग मिळता नोंदवून घे खतावणीतिल जवाब पुष्पांचा शांत पहुडल्या निळ्या झुल्यावर पारुल सुमन कळ्या वाटिकेतल्या झुडुपांवरती जुराब पुष्पांचा मोक्षस्थळीच्या वाटेवरती कुसुमांकित वेली खरा सुनेत्रा हिरा कोंदणी किताब…
-
हवाला – HAVALA
ठाम निश्चयी दृढतम श्रद्धा कशास पाळू अंधश्रद्धा दुजांवर ठेवूनी पाळत स्वतःसाठी कुणी खोदे खंदक बिनबुडाचे भांडे चुलीवर कशास नाटक व्यर्थ आगीवर निर्जरेस मज कर्मे माझी पराकडून ना घेते आंदण स्वार्थी लंपट मित्र नव्हे ते ते तर शत्रू तुटते बंधन लांछन बिंछन नाद कशाला मम कर्मांचा मला हवाला बदफैल्यांचा माज पोसुनी म्हणे सोवळा स्वतःस कोणी सोबत…
-
घटना ग्रंथ – GHATANAA GRANTH
पंचोळी … घटना घटना असुदे अथवा घट पट त्यांस असावा प्रकृतिचा तट मातीवर संस्कार करूनी घट संस्कारित कुंभाराच्या हाताचा आकार झेलूनी मृत्तिकेतले उपादान साकार जाहले… तीन शेरांचे मुक्तक ..ग्रंथ काल खेळली रंग लेखणी मस्त खरा आज चाटुनी कोप नाचरा फस्त खरा काय शिकविते गझल ओळखू सार बरे मित्र जवळचा ग्रंथ सत्य आश्वस्त खरा रंगवायला चित्र…
-
अधिकोत्तम – ADHIKOTTAM
विदग्धातली मी चतुराई आत्मसात केली अधिकाधिक शुद्धता वाङ्मयी आत्मसात केली अधिकोत्तम पण झुकता सुंदर बाकदार झाले वर्दीमधले जून हिरवटी खाकदार झाले … मूर्तिमंत सौंदर्य सत्यता तमा तळी झळकता मार्दव आर्जव घडीव सौष्ठव अंगांगी उमलले .
-
सोनी – SONEE
कळ्या फुले गुलाबाची आणि पाने ओवलेली रंगसंगती सुरेख हृदयात साकारली पूर्ण चित्र पापणीत झरझरे वासरीत हवे हवे ते मिळाले जिनदर्शनाने तृप्त लिहीत मी जाता सुचे अर्थ लागे अर्थातून अर्थासाठी अर्थ नवा जगण्याला जीवातून लिही सुनेत्रा सोनु तू सोनी जसे नाव छान मैत्र मैत्री टिकू द्यावी बालपणी गाव एक
-
बॉयलर सूट – BOILER SUIT
पाश! तुझी ती लोखंडावरची कविता… . वाचलीहं मी!!.. किती किती अन काय बनवतात रे लोखंडापासून.. खरंच लोखंडाची महत्ता अगाध आहे हो… तसा मी पण एक जॉब बनवला होता लोखंडाचा.. स्मिथी मध्ये… टीन एजर असताना.. आणि एक टिनचा बॉक्स पण बनवलेला टिन स्मिथी मध्ये!! बॉयलर सूट बनवून म्हणजे शिवून घेतलेला .. शिंप्याकडून.. मोठ्या हौसेने! स्मिथी प्रॅक्टिकलसाठी…