Tag: Marathi Kavita

  • सगुण – SAGUN

    सगुण असो वा निर्गुण तो रे प्रीत तयावर जडली माझी … जळी स्थळी काष्ठी पाषाणी मीच मूर्त त्यातून घडवली … वात्सल्याचा भाव भरोनी निर्गुण प्रतिमा सगुण जाहली … तीन रत्नयुत ज्योत दिव्याची अंतर्यामी एक उजळली …

  • साय – SAAY

    कुंतल मेंदीमध्ये भिजवुन बसली आहे मीरा वाकुन निघून गेल्या घटिका प्रहरे मूक मौन खेडी अन शहरे उठ ऊठ तू मीरे आता पाणवठी जा बनून राधा बैस जळी त्या बुडवुनी पाय पाण्यावर ती येईल साय करून गोळा त्या सायीला घुसळ घुसळ लोणी वर याया गरम भाकरीवरती लोणी खाण्यासाठी येईल कोणी

  • पाणवठा – PAANAVATHAA

    असेल कैसे शहर आंधळे लोक आंधळे असतिल काही…. भ्रमर आंधळे नसतिल सारे असतिल थोडे काही … पाणवठ्यावर तुला जायचे अजून तृष्णा असेल बाकी …. दूर वाटतो पाणवठा जरी पाणवठ्याचा रस्ता नाही …. कवीस शोधे अजुनी राधा गावामधल्या गल्ल्यांमधुनी … कवीस याची खबरच नाही पाणवठ्यावर कवी बसूनी… माझ्या गोष्टी सुंदर सुंदर ऐकायाला येच प्रियतमा… माझी गाणी…

  • आधी वादळ – AADHEE VAADAL

    आधी वादळ मुक्त फाकडे नंतर गारा… घाल साकडे … घाल साकडे वळीवाला तू … येताना तो ऊर धडाडे मेघ धावतील सैरावैरा … बिजलीचा मग चढेल पारा … कडाडता ती फुटुन हुंदके … जलद स्फुंदतिल हलके हलके काही धारा काही गारा… मौन मूक होइलग वारा … तप्त धरेवर बरसत बरसत… गाईल गाणे पाऊस नाचत मृदगंधाचा सुगंध…

  • लाटच लाट – LAATACH LAAT

    चट चट लाटच लाट फुलके चट चट लाटच लाट कट कट फारच फार नाही कट कट फारच फार खट खट वाजच वाज दारा खट खट वाजच वाज झट झट काढच काढ चित्रे झट झट काढच काढ लट लट डोलच बाळा लट लट डोलच डोल टच टच भरले नेत्र सुंदर टच टच भरले नेत्र टप टप…

  • किल्ली – KILLEE

    डबे जरी तव कैक नवे इंजिन माझे ऐक नवे अधर्म तू तर डोंबारी करण्या संसारी वारी फेकशील जर माळ्याला चिटकुन बसशिल टाळ्याला येतिल सैनिक जाळाया जाळुन कचरा गाळाया मूषक फाडे जाळ्यांना निमित्त ठरण्या टाळ्यांना किती किती तुज समजाऊ तुझिया शब्दांना खाऊ छक्के चौके फटकाऊ नौकारांना मटकाऊ मांजर माझी सुंदर रे कर ले उसको अंदर रे…

  • मोजमाप – MOJAMAAP

    गान हृदयीचे वा देहाचे ते गाणे असते इंद्रियांच्या शक्तीचे ते मोजमाप असते अपुले अपुले गाणे सुंदर आपण गावे द्यावे गाता गाता जगत अलौकिक दिपवुन टाकावे कधी न करावी चोरी आपण दुसऱ्यांच्या पैशांची स्वकष्टाने धन कमवावे मिळेल सुख शांती वंशवेल वाढण्या आपुली कुटुंब जपणे धर्म देशाचे स्वातंत्र्य टिकविण्या अभिव्यक्ती धर्म