-
रसिका – RASIKAA
मी रंगांचे लिहिले गाणे मम गाण्यावर कोण दिवाणे ठाऊक मजला कोण दिवाणे त्यांच्यासाठी लिहिन तराणे पुरे जाहले अता बहाणे पुरे पुरे चोरून पहाणे विणू प्रीतीचे ताणेबाणे कशास व्हावे अतीशहाणे शीक पुन्हा तू भरुन वहाणे मिळून रसिका गाऊ गाणे
-
पाखर – PAAKHAR
कधी लिहावे एकच गाणे कधि पाडावा पाऊस त्यांचा धारांतिल वेचुनिया गारा उतरवुया हातांचा पारा चेहऱ्यावर तळव्यांना फ़िरवुन गुलकंदी गालांना खुलवुन झरता अश्रू झरझर गाली शाल पांघरुन पाठीवरती फूलपाखरी पाखर घालू
-
दर्जी – DARJI
आज अचानक आवडता मज दिसला डस्टर शोधत असता मोबाईलचा दडला चार्जर सदैव तत्पर धूळ पुसाया डस्टर माझा धावुन येतो पिळे पिळाया ड्रायर माझा डस्टर चार्जर ड्रायर तत्पर काम कराया असुन साधने श्रमते अजुनी घाम गळाया कुशल दर्जी जरि झगे उसवुनी अल्टर करते शुभ्र झग्याचे कृष्ण मळवुनी अस्तर करते शाळेतच डांबाया तस्कर जाळे लाविन सही कराया…
-
शिरोमणि – SHIROMANI
जळात मी मन मंदिर माझे रेखांकित केले लहरींवरती तरंगणारे उभे शिल्प केले शांत पीत जल लाटांवरती हरित नील धरती पंच शिखरयुत राउळातल्या घंटा झांजरती अवती भवतीचे मोक्षार्थी नर नारी सुंदर नीर नदीचे संथ वाहते त्यात झुले अंबर देउळ की हे जहाज अपुले शिखर कळस हृदया तीर्थंकर चोवीस शिरोमणि बेल पळस हृदया
-
कृतज्ञ – krutdnya
कृतज्ञ मीही सुंदर सृष्टी सुंदर माझी सुंदर मुले डोळे माझे वीज अंबरी त्यावर अंतर झुले पूर्वजन्मिची पुण्याई मम जन्मोजन्मी वसे त्याचमुळे मम पूर्ण छबीही इतुकी मोहक दिसे अब्जाधिश मी आज जाहले सौख्य संपदा खरी हृदयी माझ्या आत्मप्रियाची वाजतसे बासरी पूर्ण देश अन पूर्ण जगाच्या सफरीला जाण्यास सज्ज जाहले कुटुंब माझे मोदाला लुटण्यास हवे हवे जे…
-
पाना – Pana
छायाचित्रांवरती माझ्या कैक तारका फिदा खुद्द माझियावरती मरती खलनायक पण सदा स्वरुप मनोहर तेजस कांती झळाळते मम दिव्य झोपडीत मम माझे गुरुजन येतिल सारे भव्य पुत्र आणखी कन्या माझी हृदयीची दो रत्ने मात-पित्यांना गुरू मानुनी मोक्ष मिळविती यत्ने बिजागरीशी जोडुन नाते नट नि पाना माझा बोल्ट आवळुन झाकण बसवी वाजवीत ग बाजा शशांक मधुरा सुभाषसंगे…
-
रम्य झोपडी – RAMYA ZOPADI
मैत्री अपुली इतुकी सुंदर मित्र-मैत्रीणीनो मैत्रीचा ही रम्य झोपडी मित्र-मैत्रीणीनो बघा वाहते झुळझुळणारे सुगंध भरले वारे स्मरती सारे रम्य आपुले दिस सारे प्यारे मैत्रीसाठी ठेवीन माझा प्राण तराजूमध्ये एकी आणि विश्वासाचे नाते मैत्रीमध्ये नकाच परके म्हणू इथे कुणा हीच खरी मैत्री जात धर्म अन प्रांत देशही म्हणती मैत्री खरी जरी न भेटतो रोज रोज पण…