-
नाकावरच्या – NAAKAAVARCHYAA
काव्यप्रकार -मंगळिका नाकावरच्या रेषेवर लिहिलंय काय? रुपसुंदर कन्येची ती कविता हाय. कलेमध्ये खऱ्या प्रवीण मुलगी कोण? वेदीवर जी ठेवतेय मूर्ती दोन. मूर्तीमध्ये शोभतोय आत्मा छान। कल्पनेने गाऊयात स्तुति गुणगान… मात्रावृत्त – १४+७=२१ मंगळिका या काव्यप्रकारात ६ चरण असतात. सहाही चरणात १४+७=२१ अश्या मात्रा असतात. पहिल्या व तिसऱ्या चरणात प्रश्न विचारलेला असतो. दुसऱ्या व चौथ्या चरणात…
-
परिमल – PARIMAL
परिमल उधळित पुष्प पाकळ्या उमलत जाती रंग बरसती धुंद होउनी कोमल पाती कोमल पाती मुग्ध कळ्यांशी माझे नाते गरगर फिरतो हात आणखी दगडी जाते जात्यामधुनी पीठ झरझरे ऐकत किलबिल वाऱ्यासंगे गात येतसे झुळझुळ परिमल
-
प्याल्यामध्ये पेय भरावे – PYAALYAA MADHYE PEY BHARAVE
प्याल्यामध्ये पेय भरावे भरून गाण्या हात पाय अन ध्येय असावे तरून जाण्या जाण्यासाठी दूरदूरवर पैल तटावर भटकत असतो गात गुराखी ताल सुरांवर बासरीतुनी गीत उतरते डोळ्यांमध्ये थेंबे थेंबे प्रेम बरसते प्याल्यामध्ये
-
झुलते सुंदर वेल – ZULATE SUNDAR VEL
झुलते सुंदर वेल मांडव सोसे फुलभार कुंपण ओले केतकी परसदार अन माड परसदार अन माड नाहतो जलधारांनी बहरुन गेले रान गातसे निर्झर गाणी झरा वाहतो मुक्त मनाने पाणी उडते चिंब भिजोनी एक सान तृणबाला झुलते
-
गिरवुन गिरवुन – GIRAVUN GIRAVUN
गिरवुन गिरवुन अक्षरे दे शब्दांना धार कलम करी तू घेउनी कर भवसागर पार कर भवसागर पार बांधुनी साकव मोठा उत्तम आर्जव ठेव अंतरी लाघव ओठा अंतर आतम तार जुळाया गाउन फुलवुन सुंदर वचने कोर त्यावरी गिरवुन गिरवुन
-
अढळ – ADHAL
चतुर्दशीच्या चंद्रासम तव मुखचंद्रावर प्रभा झळकते अर्ध्या मिटल्या नयन पाकळ्या अधरांवरती हास्य विलसते पद्मासन तव आसन शोभे नेत्रांमधुनी बरसे करुणा खिरते वाणी सर्वांगातुन समवशरण भवताली वसते दर्शन घेण्या अरिहंताचे स्वर्गामधुनी इंद्रही येती मूर्त पाहुनी सजीव सुंदर झुळुक हवेची बघ झुळझुळते पुनव चांदणे झरते जेव्हा नभांगणातिल तारे दडती सिद्धशिलेवर शिरोमणीसम सिद्धप्रभूचे स्थान अढळ ते
-
माझ्यासारखी – MAAZYAASAARAKHEE
कशाला तुलना करता तुम्ही माझी! अन्य कुणाशी! कारण मी आहे फक्त माझ्यासारखी! मला व्हायचही नाही अन्य कुणासारखं! कारण … मला फक्त रहायचय माझ्यासारखं! कारण माझं माझ्यावरच खूप खूप प्रेम आहे… आणि माझ्यावर जे कुणी प्रेम करतात, अगदी कुठल्याही अटीविना! त्यांच्यावर, मी सुद्धा प्रेम करते कुठल्याही अटीविना!!