Tag: Marathi Kavita

  • लिहीन लिहीन – LIHEEN LIHEEN

    लिहीन लिहीन काही पण लिहीन पण लिहीनच लिहीन लिहीत राहीन लिहीत राहीन जमेल तोवर लिहीतच राहीन सुचेल छान छान मस्त मस्त ते ते सारे लिहित राहीन कशाला थांबू कशाला अडखळू उगाच अडखळून पडू बिडू सापडतील ते शब्द घेईन ओळींची गाडी पुढेच नेईन झुक झुक झुकाक धावत राहीन इंजिन बनून शिट्टी घालेन हवेत धूर नाही वाफ…

  • भांडीभांडी – BHAANDEE BHAANDEE

    भांडीभांडी अन भांडीकुंडी चल भर प्यान पॉट कळसा गिंडी गंजात पाणी भरून ठेव गो प्यायाला येइ साजुक देव घो कामं किती वरी करून राह्यले तरी तुझे ना तेरा गं वाजले गाडग्यात आंबिल रटरट शिजतंय दुधाचं लोटकं भरभरुन सांडतंय संगती घेऊन सुंदर कोष्टी ये ग ये सई सांगाया गोष्टी छप्पापाणी नी सागरगोटे खेळू बिगी बिगी होऊ…

  • लेटर्स – LETTERS

    पी पी  ‘पिकॉक’ चा यू यू ‘यूज’ चा बी बी ‘बिस्लेरी’ चा एल ‘एलजी टीव्ही’ चा आय आय ‘आयकॉन’ चा सि सि ‘सिनेमा’ चा ए ए  ‘एम’ चा टी टी ‘टी’ चा आय पुन्हा ‘आयन्स’ चा ओ ओ ‘ओशन’ चा एन एन ‘एनसीसी’ चा एस एस ‘एसएमएस’ चा कित्ती ‘लेटर्स’ च्या गाडीचा इंजिन ड्रायव्हर तोडीचा…

  • तू अन मी – TOO AN MEE

    अता तुझी ना आठवण येते तुझ्यात दडल्या अनेक ‘तूं’ची कधीकधी पण आठवण येते नकळत झाली भेट तरीही नजर भिडविली कधी जरीही आठवुन ना पण धडधड हृदयी केव्हातरी मी तुजला बघते अता तुझी ना आठवण येते नाजुक साजुक गुपिते गोष्टी उघडुन मम प्रेमाची सृष्टी कधी न होते दुःखी कष्टी सत्य कळावे फक्त वाटते अता तुझी ना…

  • तो कुरुप – TO KURUP

    तो कुरुप एकदा भेटावा मजला पाहीन त्यास मी लाजेने भिजला तो लाज लाजता बघेन त्या मायेला विसरण्या जगाला अन मायेला त्याच्या ती भांडेवाली चिडव चिडवते त्याला त्या मायेची अन त्याची गट्टी फू होण्याला तो कुरुप एकदा भेटावा त्यांना समजती स्वतःला देखणे पान तयांना पुरती जिरली सर्वांची बघ आत्म्या पळाले दूर ते सारे सोम्या गोम्या

  • जीवा – JEEVAA

    बगिच्यात रमावे वाटते माझिया जीवा वाऱ्यात फिरावे वाटते माझिया जीवा रंगात भिजावे वाटते माझिया जीवा प्रेमात बुडावे वाटते माझिया जीवा आत्म्यास कळावे वाटते माझिया जीवा झुळूकीत वहावे वाटते माझिया जीवा संगीत बनावे वाटते माझिया जीवा झोक्यात झुलावे वाटते माझिया जीवा पानात फुलावे वाटते माझिया जीवा जीवनी हसावे वाटते माझिया जीवा गगनात उडावे वाटते माझिया जीवा…

  • आत्मयोग – AATM YOG

    मुला-मुलीच्या, दाम्पत्यांच्या, कुंडलीमधे, स्वार्थासाठी, ज्यांनी लिहिला, मरणयोग रे धाडिल त्यांना, यमसदनाला, कर्मच त्यांचे, पूर्वभवातिल, लिहिण्या त्यांचा, जन्मयोग रे कशास लिहिता, भ्याडांनो हे, भाकड भाकित, अज्ञानाने, मुलामुलींच्या, विश्वामध्ये करा खरेतर, काम नेकिचे, आनंदाचा, मोक्ष मिळाया, पूर्ण जाणण्या, कर्मयोग रे पोट भराया, भोग भोगण्या, भविष्य सांगुन, खोटेनाटे, मनुजांचे या, पुरते फसला प्रेमळ पालक, सदा सुखी ते,  भविष्य…