-
झुलते सुंदर वेल – ZULATE SUNDAR VEL
-
गिरवुन गिरवुन – GIRAVUN GIRAVUN
-
अढळ – ADHAL
चतुर्दशीच्या चंद्रासम तव मुखचंद्रावर प्रभा झळकते अर्ध्या मिटल्या नयन पाकळ्या अधरांवरती हास्य विलसते पद्मासन तव आसन शोभे नेत्रांमधुनी बरसे करुणा खिरते वाणी सर्वांगातुन समवशरण भवताली वसते दर्शन घेण्या अरिहंताचे स्वर्गामधुनी इंद्रही येती मूर्त पाहुनी सजीव सुंदर झुळुक हवेची बघ झुळझुळते पुनव चांदणे झरते जेव्हा नभांगणातिल तारे दडती सिद्धशिलेवर शिरोमणीसम सिद्धप्रभूचे स्थान अढळ ते
-
माझ्यासारखी – MAAZYAASAARAKHEE
-
पाऊस पडतोय मुसळधार – PAAOOS PADATOY MUSALHDHAAR
पाऊस पडतोय मुसळधार हवा मस्त गारेगार वेड्या पावसा थांब रे माझ्या घरी ये रे स्वच्छ पंचा माझा घेऊन चिंब मन काढ पुसून आरामखुर्चीत माझ्या बस माझ्याकडे पाहून हस वाफाळलेला चहा घेत गप्पा मारू मजेमजेत भविष्याची चिंता सोड हृदयापासून नाती जोड भविष्य सांगतोय कुडमुड्या त्याला सांग नको उड्या जोहड धरणात धबाब रे दरवाजातून फुसांड रे पाणी…
-
वरण भात जरि – VARAN BHAAT JARI
-
कवितांची मैफल – KAVITAANCHEE MAIFAL
ये सई हाक मार पुन्हा एकदा अंगणातून धावत पळत येईन मग वह्या पुस्तके सांभाळून हवा भरू सायकलीत कोपऱ्यावरच्या दुकानात तुझी सायकल माझी सायकल निघेल केवढ्या तोऱ्यात चढ येता नको उतरणे पायडल मारू जोरात मागे टाकू टवाळ कंपू भरारणाऱ्या वाऱ्यात आलं कॉलेज चल उतर सायकल लावू स्टॅंडला बसून चार तासांना दांडी मारू प्रॅक्टिकलला बागेमधल्या झाडाखाली बसून…