-
शिदोरी – SHIDOREE
राऊळाची वाट सुंदर नि सोपी कैवल्य चांदणे खिरे घनातून घाटातून वाट चढत जाऊया डोंगरी निर्झर खळाळे बागडे पुण्याची शिदोरी सोडून वाटून खाऊ घास घास आनंदाने ओंजळीने पाणी पिऊन तहान भागेल खरेच चला पुढे जाऊ राऊळ दिसले हात जोडले मी कळस झळाळे सूर्य किरणात चंद्रकोर बीज गगनात आली अंतरी शुद्धात्मा जिनदेव माझा राऊळी गाभारा घंटेचा निनाद…
-
कर्तव्य – KARTVYA
राजाचे कर्तव्यच लढणे पण भाटाचे गात राहणे पीत गुलाबी पाच पाकळ्या जलबिंदूंनी सजल्या भिजल्या उभी पाठीशी हिरवी पाने कळ्या किरमिजी भिजले गाणे भिजता गाणे वारा अवखळ वाहू लागतो झुळझुळ सळसळ सुगंध भिजला वाहून नेतो प्रीत फुलांची पेरून येतो
-
पुण्य – PUNYA
अहंला झुकावेच लागे अती हाव भरण्या सुपाऱ्या फटाके फुटोनी नवा गाव भरण्या मना अंधश्रद्धा किती प्रिय तरीही मला ना तयांना कुटायास बत्ते खली भाव भरण्या कशाला करू आत्महत्या असे जैन मी हो जिवांनी जगावे पुन्हा वाटते घाव भरण्या खरी संपदा पुण्य माझे अपत्त्ये गुणांची खुशीने लिहावे नि गावे पुन्हा ताव भरण्या लगागा लिहू पाचवेळा उगाळून…
-
कोवळे – KOVALE
गझलेत हेच सोवळे म्हणे जून ना नवे कोवळे म्हणे फेकून तंत्र खोडून मंत्र जाहले हेच ओवळे म्हणे कोंदणी कशाला पाचु हिरे गुंफेन मोति पोवळे म्हणे शेरात गोडवा पीळ भरू बोटात घालु हो वळे म्हणे झटका देण्या सुनेत्रा उभी फटक्यात झायलो वळे म्हणे
-
रंगमाया – RANG MAYA
निळे सावळे नभ मळलेले क्षितिजावर हे झुकलेले धवल जांभळ्या रानफुलांच्या शिवारात मन फुललेले पीत पाकळ्या हरित पल्लवी चरण धरेवर जणू पडले रंगांच्या मायेत गुरफटले
-
घण – GHAN
चला तुतारी फुंकू आपण सत्त्वर त्यागू मीपण बीपण मिथ्यात्वावर घालूया घण काव्य तुतारी फुंकू आपण ओठांनी अपुल्या अंतरीचा आवाज उमटूदे काव्यातून अपुल्या मशाल पलिते धरू पेटते दीपस्तंभ ते काव्यपथाचे अखंड चळवळ हात राबते ओंजळ ओंजळ प्रेम सांडुदे हातातून अपुल्या अंतरीचा आवाज उमटूदे काव्यातून अपुल्या जीव जपावा वत्सल भावे नकोच ईर्षा हेवेदावे स्वाध्यायाने गुण उजळावे दहशत…
-
कडप्पा – KADAPPAA
प्रीतीने भर भर ओटी वंदन दुहिते शत कोटी संथ वाहते संत मती नितळ वाहती नीर गती कांचन पाचूच्या मखरी पदर भरजरी निळी निरी काष्ठ स्तंभ दो कळस शिरी हिरवळ भूवर मुक्त सरी मुखचंद्रावर तेजस्वी भाव मनोहर ओजस्वी सरळ नासिका कृष्ण कळी काया झळझळ सोनसळी काळ कडप्पा उंबरठा मित्र जिवाचा पाणवठा सजल नेत्र घन भाव पहा…