Tag: Marathi Kavita

  • ऐक बुवा – AIK BUVAA (LISTEN MAN )

    विडंबन काव्य-तुज कष्ट नको पण दाम हवा, मूळ कविता-मज नकोत अश्रू घाम हवा, गीतकार-कविवर्य ग.दि.माडगुळकर, तुज कष्ट नको पण, दाम हवा! हा तव तंत्रांचा, साम नवा! दुध तपवुनी, साय जमवुनी, विरजुन, घुसळुन, मिळते लोणी! तूप मिळव तू, त्यास कढवुनी, हे बाईचे तू, ऐक बुवा! तुज कष्ट नको पण दाम हवा! ठेव क्षीर तू, मंदाग्नीवर, बोटांमध्ये,…

  • सोहम- SOHAM (Soham is a feeling that arises in mind or heart when you know who you are.)

    In this poem the poetess says, I want to recite my soul’s inner voice,’Soham! Soham!Soham!… Soham is a feeling that arises in mind or heart when you know who you are. कण कण खिरता मोह असूदे विरहाग्निचा दाह असूदे दिवस असूदे माह असूदे नववर्षाचा प्रवाह असूदे जीवाचा उन्मेष असूदे मीरेचा तो कृष्ण असूदे क्षमस्व अथवा…

  • पुस्तक – PUSTAK (BOOK)

    This poem is known as baal-geet. In this poem the poetess tells us , how much she loves books. आवडते मज पुस्तक भारी! गाणी गोष्टी मज्जा न्यारी! चित्रे सुंदर रंगीत लोभस, गोष्टीमधला प्रचंड राक्षस! कवितेमधली आगीनगाडी, मामाची ती बैलगाडी! इथेच मजला परी भेटते, आकाशाची सैर ही घडते! आई बाबा ,दादा ताई, प्रेमळ सुगरण आक्का बाई!…

  • शारदीय सप्तसूर – SHAARADIYA SAPTASOOR (“The seven musical notes of the Autumn season”)

    In this poem the poetess describes pleasant atmosphere and state of our mind in various seasons. आत्ममग्न शिशिराला जागविते ध्यानातून वसंताची प्रीत गाते कोकिळेच्या कंठातून केतकीच्या गर्भापरी हेमंत हा सोनसळी ग्रीष्म सखी तापवूनी बुडविते सांज जळी मेघदूत आषाढाचे नभातील खगांपरी उत्तरीय काळेनिळे उडे बघ वाऱ्यावरी धारा झरे झरझर बागडते जलपरी वीज तेज कडाडते आकाशाच्या पटावरी…

  • तरू प्रीतिचे – TAROO PREETICHE (the tree of love)

    In this poem the poetess says, today my mind became very very soft, fragnant and cool. आज किती मी कोमल बनले शीतल आणिक सुरभित बनले दवात भिजवुनी शुष्क पाकळ्या सुगंधीत मी फूल बनविले शुभ्र गुणांचे बीज पेरले मातीमध्ये अर्थ मिसळले भावजलाने त्यास शिंपले तरू प्रीतिचे वरती आले पर्ण फुलांनी बहरून गेले मांडव घालुन जाळीदार मी स्वतःच…

  • कविता माझी – KAVITA MAZI ( my poem)

    In this poem the poetess describes features and qualities of her poem. असावी तर अशी-कविता माझी कशी देह नाचरा मोर डोळे काळेभोर कान कपाचा धरी-किणकिणणारी बशी पुरणपोळीसम गोड आंब्याची जणु फोड भातावरती गरम-साजुक तूप जशी अधरी पावा धरी उडणारी ती परी झोप सुखाची येण्या-मृदू पिसांची उशी

  • शुभ्र पंख – SHUBHRA PANKH (white wings)

    In this poem the poetess describes the earth and nature when rain comes. पावसात न्हातिल पक्षी चिंब चिंब होत सुकवतील शुभ्र पंख कोवळ्या उन्हात पुष्पगंध नेत शीळ घालतो ग वात लक्ष लक्ष झुलतिल घरटी गर्द वाटिकेत मृत्तिकेत उगवतिल हरित पीत हात क्षितिजावर इंद्रधनुत रंग सहा सात