-
सर्किट – CIRCUIT (a complete closed path or route that starts and ends in the same place)
सळसळ .. उकल उखळ वा मुसळ असूदे नयनी सलते कुसळ असूदे लिहिण्यासाठी वेळ किती मज लिहित राहते सळसळ असूदे ….. अवघडलेल्यांना ते अवघड सोप्यांमधले सोपे अवघड चित्र शिल्प काव्यासम सर्किट जड बुद्धीला वाटे अवघड उघडे पडता पितळ तयांचे त्यांचें त्यांना झाले अवघड ग्राहक राजा आला दारी नकोच मोजू पाने अवघड लक्ष्मी देते सहस्त्र हस्ते सहज…
-
इंट्यूशन – INTUITION (subconscious processing)
-
शिशुपण – SHISHUPAN (BABYHOOD)
पुराण इतिहास भूगोल वाचत लिहावं पुस्तक असं वाटतं, कुणी नाही वाचलं तरी परत परत लिहावं वाटतं. दशपदीतल्या दहा ओळींचे कशाला मोजावे काने मात्रे, लय पकडुन अक्षरांवर ओढावे खुशाल सहज फराटे. काटे फराटे बरे असतात सलामत ठेवतात गुपित जपून, सरसर झाडावर झटकन पटकन जाते जशी खार चढून, अजुन अजून अजून म्हणतं बाळ चॉकलेटचा हट्ट धरून, समजावून…
-
ओणवी – ONAVI (STOOPING POSTURE)
भूवरी सांडते चांदणे चालताना गझलकारिणी माधवी जानकी जाण तू सत्य शिव पारखाया तुझी कागदी पल्लवी खोल गर्तेतल्या भोवऱ्यासंगती घेत वळसे झुले मोकळे मान वेळावते वल्लरी ही कवी कल्पना ना नदी जान्हवी दूर क्षितिजावरी दाटता मेघमाला निळ्या वीज लोळे पदी वेड लागे नभा चुंबण्याचे सुरे लाघवांनी तिच्या लाघवी पावसाची सुता ओतता घागरी मोतियांच्या सरीवर सरी सावळ्या…
-
हूड बाळ – HOOD BAAL (ENERGETIC CHILD)
-
पखरण – PAKHARAN (SHOWERING)
जाति : श्यामाराणी झुळुक पहाटे लहरत आली प्राजक्ताच्या झाडाखाली शुभ्र फुलांची पखरण झाली धवल केशरी रांगोळीने भुई चिंबली रंगात पानांवरुनी ओघळल्यावर थेंब दवाचे टपटपल्यावर लोळुन घुसळुन त्यात स्वतःला भिजली माती गंधात मातीवरचे टिपण्या दाणे रंगबिरंगी पक्षी आले टिपता दाणे गाती गाणे जणू आकडे बसलेले ते अंकलिपीतिल अंकात एक पाखरू निळे त्यातले भुंग्यामागे उडू लागले दमून…
-
नीर झरा – NEER ZARAA (STREAM OF WATER)
गगन चुंबण्या उभ्या खड्या तुझ्याच अधरांवरुन कड्या मस्त नाचतो घेत उड्या खळखळ वाजत भरे घड्या घालत भूवर पायघड्या नीर झरा ग नीर झरा… जळी तरूंचे सांगाडे बाजुस शिंदीची झाडे त्यावर मेघांचे वाडे वीज कडाडुन ते पाडे ढगातून कोणा धाडे नीर झऱ्यास नीर झऱ्यास … कधी करितसे शांत जला बिंब दावण्या गवतफुला उडवुन अंगावर पाणी तृणपात्यांना…