-
अनुभव – ANUBHAV
तृणपात्यांची लवलव सळसळ चिमणपाखरे करिती कलरव दाणे टिपता चाले पदरव भ्रमरांचा गुणगुण गुंजारव जुने तरीही भासे अभिनव रोमांचित मम अवघे अवयव अनुभूतीचा अनुभव सुंदर गझलेचा काव्यातुन उदभव शब्दांमध्ये मार्दव शैशव माधुर्यातिल आर्जव लोभस मात्रावृत्त -१६ मात्रा
-
वसंत गीत – VASANT GEET
माघ फाल्गुनी वसंत वारे कृष्ण अंबरी अनंत तारे आम्रतरू गुलमोहर फुलतो बहर जोवरी तोवर झुलतो पक्षी उडती दिगंत सारे चैत्र उन्हाची रंग पंचमी गाते सरिता दंग संगमी गीत तिला जे पसंत गारे ग्रीष्म काहिली येथे तगमग सहा ऋतुंची जेथे लगबग घेण्या अंमळ उसंत यारे मात्रावृत्त (८+८=१६मात्रा)
-
तरूतळी – TAROOTALEE
या स्थळी तरूतळी स्वच्छ सुंदर झोपडी धरी शिरी सावली गर्द झुंबर झोपडी झुलतसे बाळ गुणी पांघरोनी गोधडी अंगणी सई विणे अंगडी अन टोपडी लिहित बसे गोप कोणी उघडुनी चोपडी दूर तिथे बोलण्यात दंगलेली चौकडी नगरजन नित्य येती वाट करुनि वाकडी
-
निसर्ग – NISARG
गोड फळांचा रस मिळवाया हृदयामध्ये हवीच गोडी आख्खा आंबा मिळूदे अथवा स्वच्छ बशीतून खाव्या फोडी संत्री बोरे चिक्कू द्राक्षे केळी पेरू अननस नारळ डाळींबाचा रस अमृतमय मधुमेहावर औषध जांभुळ फळे मिळाया झाडे लावू निगराणीने तया वाढवू निसर्ग जपण्या आणि फुलवण्या मनामनांतिल प्रेम जागवू
-
झाडांसंगे करून मैत्री – ZAADAANSANGE KAROON MAITREE
झाडांसंगे करून मैत्री चला गाउया गाणे चिमण्यांसाठी स्वच्छ अंगणी भरड पाखडू दाणे शकुन सांगण्या रोज कावळा उडून येता दारी न्याहरीस मग देऊ त्याला गरमागरम भाकरी गच्चीमध्ये रान पारवे नाचत येती जेव्हां वाढू त्यांना चघळायाला कडधान्याचा मेवा तहानलेला पक्षि अनामिक बनुन पाहुणा येता वाडग्यातुनी पाणी देऊ नाश्त्याला पास्ता सायंकाळी झोपाळ्यावर बसून झोके घेऊ दिवा लावुनी देवापुढती…
-
आले वर्ष नवे आले – AALE VARSH NAVE AALE
आले वर्ष नवे आले आले वर्ष नवे आले… रवि किरणांचा कनक पिसारा उजळुन टाकी परिसर सारा फुलवित शेत मळे… पुष्प सुगंधित बाग जाहली चिंता साऱ्या मिटवुन फुलली मोजित घटका आणि पळे… आले वर्ष नवे आले आले वर्ष नवे आले…
-
जयमाला – JAYAMAALAA
जय रमणी मन हरिणी गुणवर्धन जननी तव उदरी नव नगरी रत्नत्रय खाणी तू दुहिता झुळझुळता तेजोमय सदनी मृदु निश्चय व्यवहारे जाणिशि नय दोन्ही दल अधरी क्षिर झरुनी फुलते ही सृष्टी घट गवळण भरभरुनी करते बघ वृष्टी घन अंबर तन झुंबर सळसळतो अग्नी मंजुळ रव नीतळ दव जल आरसपानी शशधर तो अघहर श्री धरितो शक्तीला सत…