Tag: Marathi Nisarga-kavita

  • आले वर्ष नवे आले – AALE VARSH NAVE AALE (new year came)

    आले वर्ष नवे आले आले वर्ष नवे आले… रवि किरणांचा कनक पिसारा उजळुन टाकी परिसर सारा फुलवित शेत मळे… पुष्प सुगंधित बाग जाहली चिंता साऱ्या मिटवुन फुलली मोजित  घटका आणि पळे… आले वर्ष नवे आले आले वर्ष नवे आले…

  • जयमाला – JAYMALA (“garland of victory”)

    जय रमणी मन हरिणी गुणवर्धन जननी तव उदरी  नव नगरी रत्नत्रय खाणी तू दुहिता झुळझुळता तेजोमय सदनी मृदु निश्चय व्यवहारे जाणिशि नय दोन्ही दल अधरी क्षिर झरुनी फुलते ही सृष्टी घट गवळण भरभरुनी करते बघ वृष्टी घन अंबर तन झुंबर सळसळतो अग्नी मंजुळ रव नीतळ दव जल आरसपानी शशधर तो अघहर श्री धरितो  शक्तीला सत…

  • पायवाट – PAYVAT(trail)

    मोहरीच्या रानामध्ये रंग हळदीचा खुले वारियाच्या झुळकीने मोहरली फुलेफुले कोण बरे जाई पुढे घडवुनी पायवाट रंग मातीचा मनात लोचनात स्वप्न घाट रान सारे हासणारे पुढे शांत हिरवाई तिथे असावी झोपडी अंगणात जाई जुई किलबिल पाखरांची मोद हसे ठाई ठाई

  • शुभ्र निळाई – SHUBHRA NILAAI (pure blue whiteness)

    In this poem ‘Shubhra Nilai’, nature’s beauty is described. The beauty of streams, waterfalls, a clean blue sky and greenery is portrayed. जिथे पहावे तिकडे निर्झर, खळाळणारे प्रपात निळसर .. आकाशाची शुभ्र निळाई, हसते सृष्टी दिसते सुंदर! जिथे पहावे तिकडे हिरवळ, फुलाफुलांचा मनात दरवळ … आगिनगाडी झुकझुक चाले, हसते धरणी खळखळ खळखळ!!

  • दुःख – DUHKHA (grief)

    दुःख (गझल) –  अनुवादित गझल इलाही जमादार यांच्या मूळ उर्दू गझलेचा (तनहाई-ग़ज़ल- शायर- इलाही जमादार गुफ़्तगू-प्रथम संस्करण १५ जून २००७) मुक्त भावानुवाद. आम्र तरुतलि, ऊन सावलीत, मौन एकटे, बसलेले.. किलबिलणाऱ्या, किरणांखेरिज, शांततेत जग, रमलेले… जिथे पहावे, तिकडे लाटा, गाज सागरी, भरतीची.. असले कसले, वेडे जल ते, नाव, किनारा, नसलेले… तृप्त धरेवर, अम्बरातली, मुग्ध लाजरी, प्रतिबिंबे..…

  • जिनवाणी ‘बोलू’ – JINAVAANEE ‘BOLU’ (let us speak jinvani)

    कुंकुमवर्णी गडद गुलाबासम सुंदर कांती जर्बेरा अन शेवंतीची कुंतलात फांती पद्म पाकळ्यांवर भृंगांसम नेत्री तेजप्रभा आम्रफलासम मुखकमलावर नाकाची शोभा भृकुटी दोन्ही तोल साधण्या वळणदार वेली ओठ टपोरे बदाम लालस गालांवर चेरी पिंपळपाने दोन कर्ण अन कुंडल जास्वंदी बकुळ फुलांची नाजूक रेखिव भाळावर बिंदी घटपर्णी डौल गळ्याचा सर प्राजक्ताचा पदर उन्हाचा हळदी रंगी स्पर्शे सहज नभा…

  • पावश्या घूम – PAVASHYA (brainfeverbird)

    घूम घूम पावश्या चारा देती मावश्या चारा आहे मऊ पाऊस तुझा भाऊ ये रे ये रे भावा भाषा शीक जावा भाऊ शिकला भाषा पणजा गुंडाळी गाषा…