-
यात्रा – YAATRAA
वेध तुझ्या यात्रेचे मज अता लागले रे दर्शनास आतुर डोळे साद ऐकते रे एक एक पाउल उमटत,असे वाज वाजे संगतीस प्रियजन त्यांची गाज जाहले रे निळ्या डोंगराच्या रांगा नभा वेढणाऱ्या गाठण्यास टोके सुंदर गात चालले रे पल्लवीत हिरव्या राया मोहरून आल्या आम्र मंजिरी मी मजला झुळुक चुंबते रे सुनेत्रात भरुनी घेउन स्वरुप आत्मदेवा तुझे भाव…
-
शिशीर गान – SHISHEER GAAN
पाऊस यावा अंगणभर अंगांगी काटे कुंपणभर आवाज यावा ढगी गड गड पडाव्या गारा छपरावर वेचाया हातांची ओंजळ करू मुठीत मोठाल्या गारांना धरू मंडपी चिंब जाई नि जुई जा ग जा चिऊ घरट्यात बाई जा उड रे काऊ शुभ शुभ गाऊ शिशिरात बुडण्या धारांत न्हाऊ
-
आषाढ अधिक – ASHADH ADHIK
पाऊस उखळात कांडे धो धो आषाढ अधिकात नाचे धो धो फुसांडे वेगात गर्जत उसळत नदी पावसाळी वाहे धो धो प्रपाता ओतीत जलास घुसळत पाऊस धबाबा सांडे धो धो फेनील पाण्यात तुषार उधळित पाऊस रंगात रंगे धो धो विजेचा आसूड फिरवित ढगात पाऊस हुंदडे धावे धो धो मात्रावृत्त (१०+४+४=१८ मात्रा)
-
पाऊस धारा – PAAOOS DHAARAA
पाऊस धारा वाऱ्यात नाचत येती दारात फुलवाल्या सुंदर बाला फुले ओविती हारात फिरवित छत्री निळी निळी सखी निघाली तोऱ्यात हूड वासरू भुकेजले तोंड घालते भाऱ्यात कशास तुलना हवी बरे सुई आणखी दोऱ्यात मुक्त मनाला हुंदडुदे नकोस ठेऊ काऱ्यात मुग्ध काव्य मम हृदयातिल उठून दिसते साऱ्यात
-
पवनचक्की – PAVAN CHAKKEE
आला आला वारा रे पाऊस आणिक गारा रे चल चल जाऊ खेळाया अंगणी गारा वेचाया पागोळ्या झरझरती ग झरे नद्या खळखळती ग भरून ओढा वाहे ग ऊन त्यावरी सांडे ग सोनेरी पाणी झाले बिंब केशरी वर डोले शिंदीची झाडे डुलती बकऱ्या सान तिथे चरती हिरवळ धरणीवर हिरवी पवनचक्की मारुत फिरवी सूर्य निघाला झोपाया पुन्हा पहाटे…
-
उन्ही उन्हाळा – UNHEE UNHAALAA
टळटळणाऱ्या मस्त दुपारी ऊन सांडते भरून झारी तशात अवचित सुटते वादळ नयनी ख च्या भरते काजळ पाचोळा उडणारा भिरभिर घरात पंखा फिरतो गरगर नभी कृष्ण जलदांच्या माला म्हणती पाऊस आला आला मेघ गर्जना गडगड गडगड पक्ष्यांची झाडावर बडबड वीज नाचते कडकड कडकड वळवाची सर तडतड तडतड छपरावर उडणाऱ्या गारा अंगणात ओघळती धारा वळचणीस चिमणीची चिवचिव…
-
पर्याय तम छाया आतप उद्योत – PARYAAY TAM CHHAAYAA AATAP UDYOT
तम म्हणजे पुदगल द्रव्याचा सप्तम पर्याय तम म्हणजे काळा काळा अंधकार घन होय अष्टम पर्यायी छाया ती दो प्रकाराची तदवर्णपरिणत अन प्रतिबिंब उपप्रकाराची दिसे रंग रुप जसे तसे ते तदवर्णपरिणत केवळ छाया उन्हात पडते ते म्हण प्रतिबिंब पुदगल द्रव्याचा आतप हा नववा पर्याय सूर्य प्रकाशालाही म्हणती आतप वा ऊन चंद्राचा जो प्रकाश शीतल उद्योत आहे…