पायऱ्या चढण्यास येती रोज कोणी
चढत असता सहज देती पोज कोणी
साजरा करण्यास येती रोज डे पण
पाकळ्या तोडून म्हणती मोज कोणी
बाहुली ती मोडल्यावर खेळण्यांतिल
उडविती त्या बाहुलीचे नोज कोणी
ती कुठे गेली हवेली राजधानी
तो जुना इतिहास म्हणती बोज कोणी
श्वास घेता या हवेतिल प्राणवायू
भरतसे हृदयात माझ्या ओज कोणी