Tag: MARATHI POETRY

  • सुई – SUEE (NEEDLE)

    सूत पकडुनी स्वर्ग गाठणे अवघड असते बिनछिद्राची सुई ओवणे अवघड असते जरी ओवला सुईत धागा अंधारातच अंधाराला शिवण घालणे अवघड असते प्रथमदर्शनी प्रेमामध्ये पडल्यावरती उठता बसता प्रेम पटवणे अवघड असते कोणालाही ना जोखावे मुखड्यावरुनी मुखडा पाहुन अंतर कळणे अवघड असते असे पटवले तसे पटवले गप्पा सोप्या हृदयामध्ये प्रीत टिकविणे अवघड असते पटवायाची बोलायाची बातच सोडू…

  • मुखडे – MUKHADE (FACES)

    मुखड्यावरुनी मनुष्य कळणे सोपे नसते कळल्यावर पण ते समजवणे अवघड असते पूस माणसा ऐना अपुला बिंब पाहण्या ना पुसला तर अवघड सारे होवुन बसते विनाशकाले विपरित बुद्धी झाल्यावरती मोहाच्या जाळ्यात माणसा युक्ती फसते ना प्राण्यांना ना झाडांना मीपण बीपण फक्त माणसा अहंपणाची नागिण डसते मुखडे बिखडे विकार विसरुन हात जोडता शुद्धात्म्याचे रूप मनोहर हृदयी ठसते

  • एकटी – EKATI (ALONE)

    एवढ्या गर्दीत होते एकटी जाहली जाणीव पण ती शेवटी ते मला म्हणतात ताई का बरे मी जरी आहे तयांहुन धाकटी जर रजा आहे हवी तर वाज रे मोकळे बरसून वेड्या घे सुटी सर्वजण म्हणतात मजला सावळी फक्त प्रियला वाटते मी गोरटी मी तुला सांगेन जे ते ऐक तू मी खरेतर गोरटी ना गोमटी

  • वटवाघुळे VAT VAGHULE (BATS)

    पहाट झाली जागी झाले तेव्हा वटवाघुळे मला म्हणाली अंधारातच पिंपळ सळसळ करतो आहे मला म्हणाली झिपरी पोरे मजेत गाती वेचत कचरा रस्त्यावरती गुणगुण गाता गाता गाणी असे गायचे मला म्हणाली बूच फुलांचा सडा मनोहर वेचायाला फुले जायचे स्वप्न किती दिवसांनी अजुनी पुरे व्हायचे मला म्हणाली फिरावयाला निघे पाखरू घरट्यामधुनी माय पाहते चिमण पाखरे किलबिल करती…

  • माझी तरही – MAAZEE TARAHEE(MY TARHI GHAZAL)

    तरही तरिही तरली तरली गझलियतीने चढली तरली माझी तरही लाख गुणाची जरी तरकली टिकली तरली उले आणखी मिसरे सानी गुंफुन तरही बनली तरली फुले पाखरे पर्णरुपातुन तरही कशिद्यावरली तरली तरहीमधुनी हसत सुनेत्रा झुल्यावरती झुलली तरली

  • मुरलीचे स्वर – MURALEECHE SWAR (MELODIES OF THE FLUTE)

    गहन !गहन ! आषाढ घनांतुन कृष्ण नीळ तन मन जलदांतुन शकुन्तलेचे कुंतल श्यामल बरस बरसती झरझर भूवर कुरळ कुरळ कचभार प्रियेचा उडवत जाता झोत हवेचा कालिंदीच्या सलील जलावर हिंदकळे राधेची घागर पाझरणाऱ्या त्या सलिलावर मुरलीचे स्वर… मुरलीचे स्वर….

  • घननील जलद – GHAN NIL JALAD (DENSE BLUE CLOUD)

    आषाढातिल घननील जलद भरलेला अंतरी भरूनी हलके झरझरणारा आषाढ घनातुन संदेश प्रिये तुज देण्या मी येतो तुझिया नयनांत भराया वारा पाऊस थबकला बरस बरसला दारी मेघातुन आला लोळण घेण्या दारी अक्षरे पेरुनी भूवर मम अंगणी तो हसतो आहे हिरवेपण लेऊनी पानांचा पाऊस टपटपे भिजे माधवी पान फुली उमलून वल्लरी चढे मांडवी आतुरलेली गतकाळाची आठवण सुकली…