Tag: MARATHI POETRY

  • जंग – WAR

    भोवतीच्या रिंगणाला चालताना लंघ मित्रा तुज सदोदित रोखणारी वाहने कर भंग मित्रा घे भरारी ठोक भीती चुम्ब शिखरे पर्वतांची सोकलेले अंध मांत्रिक सोड त्यांचा संघ मित्रा कंच हिरवी लाल माती सप्तरंगी इंद्रधनुतिल लाव दुजाला स्वतःला भावती ते रंग मित्रा गाल गाल लगावलीची शेर बब्बर धीर सांगे गोष्ट मैत्रीची खरी पण चंट चालू तंग मित्रा धर्म…

  • भट्ट – SCHOLAR

    जागा बागा नागा गागा गालल ललगा रागा गागा मी लगावली रचली आहे आ अलामत लगागा गागा राग रंग गा अक्षर कायम काफियांत मम पागा गागा दोन लघु गुरू इतुके ज्ञानी भट्ट करामत गागा गागा चित्र सुनेत्रा नवी हवेली मम चैतन्या फागा गागा

  • अधिक -MORE

    वनदेवीच्या वनात जागा आपण पाहू वनदेवीच्या रणात बागा आपण पाहू भरले जे जे कषाय तू जे अंतर्यामी वनदेवीच्या तनात रागा आपण पाहू फुलाफुलांवर कळ्याकळ्यांवर रंग दुपारी पावसात पण सौरभ प्राशत दंग दुपारी रंगबिरंगी छत्रीमध्ये पाऊस धार अधिक श्रावणी चिंब चिंब मम अंग दुपारी मनपसंत या हवेत फिरुया गाऊ गाणे पाकोळ्यांसम मजेत उडुया गाऊ गाणे गझल…

  • पद्माग्नी – FIRE LOTUS

    जलद गतीने जलद बरसले जलधर गगनी गाली हसले कडाडताना वीज नभांगणि ढग घन लोभी का खेकसले मुसळ घुसळती पाऊस धार जणु कोसळते कंटक धसले जिनालयाच्या कलशामध्ये पद्माग्नीचे धन रसरसले भलेभले जनवारी धारक असे कसे दलदलीत फसले कुंडीमधल्या मनीप्लांटला कोरफडीचे घन मूळ सले ओळख पाहू तूच सुनेत्रा कोण तरकले कोण तरसले

  • निळा गारवा – BLUE COOLNESS

    मळलेल्या मम वाटेवरती मळता का हो जुन्या पुराण्या जखमांतुन भळभळता का हो शब्दांना तू पुद्गल म्हणुनी वापर मर्दा पूस जनांसी शब्द ऐकुनी चळता का हो बनी केतकी दाटुन येता गंध मृदेचा नागवेलिच्या पानांवर सळसळता का हो खोल डोह मन अथांग पाणी गडद काळिमा झऱ्याप्रमाणे नीरावर खळखळता का हो चमकायाचे नव्हते जर तर उगा फुका रे…

  • जिवंत – ALIVE

    प्रेम खेचण्या इतुकी ताकद सुरात माझ्या माझी नियती दवा जादुई करात माझ्या हवेत परिमल तरंगणारा लयीसवे मम बागडती पाखरे अंगणी घरात माझ्या असेल वेडा पीर कुणी तो नेक जाणता मोहरून थरथरतो भिजतो स्वरात माझ्या हरेक जीवांसाठी माझा जीव जागतो जिवंत स्वप्ने दिडदा दिडदा उरात माझ्या ताल गझलचा ठेका अनवट प्राण सुनेत्रा कळ मायेची बळ गरुडाचे…

  • खलास – OVER

    खलास … मुक्तक खलास करते रण अतिरेकी डोके एखादे खलात कुटते चिकण सुपारी डोके एखादे गडे काफिया मुक्तकातला ओळख सुंदर रफार ई वर जणु वेलांटी डोके एखादे अलबेली … मुक्तक जशी टोकरी हवी हवेली हवी तशीच मैत्री मज अलबेली हवी कुसुमांकित तनु पर्ण चित्र पाऊस अशीच छत्री कवीस वेली हवी