Tag: MARATHI POETRY

  • रे मना – RE MANAA ((“oh my mind”)

    आज तू बोलना रे मना मौन तू त्यागना रे मना सावल्या सोडुनी चालल्या भटकणे सोडना रे मना पांगली माणसे जवळची ती पुन्हा जोडना रे मना गोडवा चाखण्या प्रीतिचा विकृती जाळना रे मना रडविले तू मला कैकदा मजसवे हासना रे मना मैत्र हे अंतरी टिकविण्या मोकळे होचना रे मना गा पुन्हा गीत तू ते जुने भिजवुनी…

  • पद्मावति – PADMAAVATI (goddess)

    लिहित रहा तू गात रहा तू कुणी न गझला तुझ्या विके घडीभराचा, घेच विसावा, पुढे दाटले, गच्च धुके हळूहळू अरुणोदय होइल, शांत झोपल्या, धरेवरी दिशा स्वतःही, निघे पूजना, वस्त्र तिचे मृदु, धूत फिके स्वच्छ झाडल्या, पदपथावरी, प्राजक्ताचा, सडा पडे भल्या पहाटे, वेचत पुष्पे, कोणी बालक, गणित शिके पालखीत वनदेवी बसता, चवऱ्या ढाळी, रानजुई स्वागत करण्या,…

  • सोन्याचा शिंपला – SONYAACHAA SHIMPALAA (golden mussel)

    एक तुला मी दिला शिंपला सोन्याचा शिंपला दवबिंदूंना झेलायाला सोन्याचा शिंपला दोन शिंपले मिळून बनते हृदय आपुले जरी उघड शिंपला अलगद वरचा हो पंखांची परी दोन शिंपले दोन दलांसम घे तू पाठीवरी होउन खग मग घेच भरारी निळ्या घनांच्यावरी हृदयामधल्या दवबिंदूचे मोती उधळित जा पडतील मोती जेथे जेथे अमृत शिंपित जा येतील वरती मातीमधुनी मोत्यांची…

  • नवनवोन्मेष शालिनी – NAV NAVONMESSHA SHAALINEE((“possessing the faculty of ever-fresh invention or constant creative intution”)

    नवनवोन्मेष शालिनी मम प्रतिभा वरदायिनी ।धृपद। नऊ रसांचे पान करोनी नव रंगांची उधळण करुनी तृप्त हसे शरदिनी ।१। मधुघट भरले पावित्र्याने सतार दिडदा गाते गाणे मयुर नाचतो वनी ।२। शेवंती अन झेंडू माला आम्रपर्णयुत तोरण दारा रांगोळी अंगणी ।३। अम्बरातले चंद्र चांदणे बिंब जलातिल लोभसवाणे शुभ्र किरण कुमुदिनी ।४। निळे सरोवर भरून वाहे हंस हंसिनी…

  • पर्व पर्युषण – PARVA PARYUSHAN (jain festival)

    भाद्रपदातिल शुक्ल पंचमीस पर्व पर्युषण येते खास तिथिस या नेमाने मग प्रियची आठवण येते प्रिय म्हणजे जो हृदयी वसतो व्यर्थ न भटकत बसतो धर्म अहिंसा स्थापित करण्या मनामधे अवतरतो देवघराचा मोह न प्रियला प्रियवर मोहित सैनी पुण्यभूवरी प्रियसाठी नव मंदिर बांधे जैनी क्षमा मार्दवे जीव शोभतो आर्जव सुवर्ण कंकण देह शुद्ध अन हृदयी शुचिता हे…

  • गझलसदृश्य – GAZAL SADRUSHYA (some what like ghazal, but not in proper ghazal meter)

    जर्द रवीला जाळ म्हणूया भडक फुलांची दुशाल म्हणुया करे प्रदर्शन दानाचे जी तिजला बोली सवाल म्हणुया स्वच्छ मनाचे मुलगे जे जे त्या मुलग्यांना बाल म्हणूया पक्षपात जो कधी न करतो त्याला सुंदर काल म्हणूया कटकट मोडे त्या काष्ठाला मस्त भिजोनी वाळ म्हणूया जीव जीवाला जीवच म्हणतो पुदगलास पण माल म्हणूया सिंहकटीसम कमर जिची तिज चाळ…

  • गालगाल – GAAL GAAL

    गालगाल गालगाल गालगाल गोबरे ओठओठ लाललाल रंगलेत साजरे पानपान फूलफूल आज मस्त डोलते का उदास जाहलेत नेत्र कमल बावरे चाबऱ्या कळीस कोण भ्रमर गोष्ट सांगतो ऐकताच साद हाक ती म्हणेल थांब रे वाह वाह दाद देत गझलकार धुन्दले लाल होत लाजुनी गझल पदर सावरे हाय हाय बाय बाय करत बॉस हासता ऐक बोल गजल मधुर…