-
कार्यकारणभाव – KARY KARAN BHAV
कार्यकारण भाव जाणू सृष्टिचे विज्ञान जाणू रोखण्यास्तव कर्मबंधन संवराचे कार्य जाणू जीव पुद्गल वेगळेपण अंतरी ध्यानात जाणू निर्जरेच्या साधनेला तपवुनी देहास जाणू धर्म जीवांचा अहिंसा हे सुनेत्रा सत्य जाणू
-
सोनी – SONEE
कळ्या फुले गुलाबाची आणि पाने ओवलेली रंगसंगती सुरेख हृदयात साकारली पूर्ण चित्र पापणीत झरझरे वासरीत हवे हवे ते मिळाले जिनदर्शनाने तृप्त लिहीत मी जाता सुचे अर्थ लागे अर्थातून अर्थासाठी अर्थ नवा जगण्याला जीवातून लिही सुनेत्रा सोनु तू सोनी जसे नाव छान मैत्र मैत्री टिकू द्यावी बालपणी गाव एक
-
बॉयलर सूट – BOILER SUIT
पाश! तुझी ती लोखंडावरची कविता… . वाचलीहं मी!!.. किती किती अन काय बनवतात रे लोखंडापासून.. खरंच लोखंडाची महत्ता अगाध आहे हो… तसा मी पण एक जॉब बनवला होतलोखंडाचा.. स्मिथी मध्ये… टीन एजर असताना.. आणि एक टिनचा बॉक्स पण बनवलेला टिन स्मिथी मध्ये!! बॉयलर सूट बनवून म्हणजे शिवून घेतलेला .. शिंप्याकडून.. मोठ्या हौसेने! स्मिथी प्रॅक्टिकलसाठी ”’…
-
शाश्वत – SHASVAT
आरोग्य लाभले मज आहे किती निरामय आभार मम भुताचे मम वर्तमान तेजस काहीच ना उणीव कुठलीच खंत खेद घेईन दो करांनी देतेय पूर्व कर्म जगण्यात भावपूर्ण आरोग्य साथ देते आत्म्यातल्या जिनाचे गुणगान नित्य गाते रत्नत्रयास जपणे मम हाच धर्म शाश्वत लिहिती जिनानुयायी समृद्ध भोवताल गाणे असेच गावे हृदयातुनी झरावे लाचार भ्रमित मिथ्य गेले पळून गेले
-
चौकस – CHOUKAS
बंध बांधतात जीवाला संसार मग सुरु होतो, भावभावनांचा आस्रव होता पालवी फुटुन हिरवा होतो. नातीगोती फांद्यांसमान पानाफुलांनी बहरून जातात, सहा ऋतूंचे चक्र त्यातून हळूहळू फिरत राहतात. मातृपितृधर्म स्मरून सहज व्हावीत कर्तव्ये, व्यवहार निश्चय जपत जपत सांभाळावे घर आपले. कधी थोडे कठोर व्हावे स्वतःस शिस्त लावावी, हृदयामधले मंदिर मूर्ती ध्यान लावून पाहावी. आपलेच कर्म आणि इच्छा…