Tag: Marathi sahitya

  • वाघीण – VAGHIN (TIGRESS)

    वाघीण बैसलेली चित्रात एक शांत आकाश चन्द्र शीला झुंजार लेक शांत मौनातल्या गुहेचा आधार कोण सांग सत्यास कोण वाली देणार चेक शांत लेकास ल्योक बोली भाषेत शब्द जाण त्या इंग्रजी तळ्याला म्हणतात लेक शांत कोणास आठवेना केलेय पाप मोप त्याला न माप काही खातीच फेक शांत चोरी इथे पहाटे करतात शब्दचोर करतातअंधभक्ती करिती रिमेक शांत…

  • प्राणी – PRANI(ANIMALS)

    आषाढ संपला ना आहे अजून बाकी येणार श्रावणाची धारा स्मरून बाकी कोणास वेध लागे गोणी भरावयाचा करण्या वसूल मरमर ठोके धरून बाकी अंदाज हावऱ्यांचे भोगात साठलेले कर्मे कुटील नीती दारी सजून बाकी निंदा टवाळ खोरी खात्यात परतलेली चोरी कशाकशाची बघ आठवून बाकी कल्याण तव कराया बसलेत दोन प्राणी लावून पाय पळ तू विसरून धून बाकी

  • स्वतः – SWATHA(MYSELF)

    स्वतः स्वतःवर करते प्रेम स्वतः मुलांवर करते प्रेम हृदय फुलांचा दरवळ घेत स्वतः जगावर करते प्रेम तनामनासह बुद्धी साक्ष स्वतः जिवांवर करते प्रेम जरी कुणाला वाटे धाक स्वतः गुणांवर करते प्रेम बुडवुन लज्जेस सुनेत्रात स्वतः जिनावर करते प्रेम

  • दूत- DUT(MESSANGER)

    आषाढ योग वर्षा मेघांत दूत आहे क्षितिजावरून येतो जलदांत दूत आहे काव्यातल्या स्मृतींनी बघ प्रीत रंगलेली मम प्राण सांगतो मज प्राणांत दूत आहे नक्षत्र श्रवण आहे पंचांग एक लिहिते बांधीव सन्मतीच्या अंकांत दूत आहे गुंफीत अक्षरांचे सूत्रात लक्ष मोती येई अवस दिव्यांची दीपांत दूत आहे नुरली मनात शंका शंखास फुंक वाऱ्या धर ओंजळी सुनेत्रा हातांत…

  • इगो – EGO

    गुरू पौर्णिमा झाली आज धन्य जाहला वाली आज दिवा लाविता जिनालयात शांत भासते काली आज धूप जाळता प्रहरी दोन सुरात स्वर लय ताली आज भरली रक्षा दाणेदार न झरले आसु गाली आज अंक अक्षरांचा बघ खेळ किती बदलल्या चाली आज असल्या खेळा उखडुन टाक रक्षण करण्या ढाली आज जिनेश्वरावर श्रद्धा ठाम इगो कुणाचा खाली आज

  • श्रीफळ – SHREE FAL(COCONUT)

    सावन श्रावण आणत आहे धन मनभावन आणत आहे घाण तुंबली घालविण्यास्तव गटार पावन आणत आहे लोळायाला गटारींतुनी कर नाटक पण आणत आहे गझल लिहूकी पुरेल मुक्तक श्रीफळ रावण आणत आहे आंबोळी द्वाशी उत्ताप्पा धिरडे घावन आणत आहे पाक रसोई घर ठेवाया नूतन साबण आणत आहे रीळ कुंडली फिल्म सुनेत्रा कुंडल कंकण आणत आहे

  • षण्मुख – SHANMUKH(SIX-FACED)

    पुरुषार्थाची ओळख ओळख ; निरहंकारी हसमुख ओळख . अंतर ज्याचे निर्मल निर्मळ ; बुद्धी त्याची तल्लख ओळख . दिवा तेवतो भाव उजळण्या ; तोच निरंजन अल्लख ओळख . . दहा दिशांचे वसन जयाचे ; देव दिगंबर षण्मुख ओळख . नऊ मोजण्या जिनायतन मम ; मीच सुनेत्रा पारख ओळख .