Tag: Marathi sahitya

  • घनसर नाणी – GHANSAR NAANEE (SOLID COINS)

    मधाळ प्रीती वचनामध्ये उतरू दे ग सुकलेले सुख जळणामध्ये उतरू दे ग बुडून जाता भरतीच्या या उचंबळात मधुरा भक्ती भजनामध्ये उतरू दे ग दे चटका डाळीस शिजवुनी जड कढईत रंग गुळाचा पुरणामध्ये उतरू दे ग जिरे मिरे वाटून फोडणी दे डाळीस स्वाद तयांचा वरणामध्ये उतरू दे ग रदीफ माझ्या गझलेमधले वादातीत पदे आरत्या कवनामध्ये उतरू…

  • घुबडे – GHUBADE (OWLS)

    कोंदटलेले धुके वितळले नभ जलदांनी भरले अवचित हॅरी पॉटरचेच जादुई कुंभ नभी गडगडले अवचित डिमेंटॉर्सच्या कृष्णकलांनी झाकोळुन आत्मे घुसमटता आश्रयदाते आकाशातिल मरुतातुन अवतरले अवचित छडी फिरवुनी “पड पड धो धो” मंत्र जपतसे वीज नाचरी मंतरलेल्या मग मेघातुन मौक्तिक जल टपटपले अवचित सुसाट चक्रीवादळ गरगर ढगांस फिरवुन धडका देता आभाळाचे टपोर श्यामल नयन कैक झरझरले अवचित…

  • ब्लॅक – BLACK

    कचेरीत फ्लिटविकच्या होता कैद सिरिअस ब्लॅक कृष्णकला वर्गात कोंदटे रंग कळकट ब्लॅक हिप्पोग्रिफवर बसून झाला मुक्त काळ कुत्रा परतुन हॅरी गिळे मृदु चॉकलेट कडवट ब्लॅक चंदेरी काळवीट उमदा नाम प्रॉन्ग्ज त्याचे खरा धाडसी आश्रयदाता रात्र अनवट ब्लॅक हर्माइनी नि हॅरीची ही करामत जादुई निरोप घेई आनंदाने हात हलवुन ब्लॅक घटिका गोलावरती घुमवुन काळाला मागे तृप्त…

  • अझ्कबान -AZKABAAN

    हॅरी पॉटर साठी शाही बस जादुई आहे चष्म्यावरच्या जलास पुसण्या हर्माइनी आहे ‘दूर सार’ मंत्रोच्चाराने जल उडूनी जाते स्वच्छ होतसे ऐनक म्हणुनी खेळा गती आहे भूतकाळ पाहण्यास होता चानेमका ऐना भविष्य विषया शिकवण्यास प्रा. ट्रेलावनी आहे सर्वहारकांपासुन मुक्ती शिकविती प्रा. लुपिनी या जादूत आश्रयदाता मंत्र मोहिनी आहे अझ्कबानचा कैदी असुनी येई सिरिअस ब्लॅक त्या काळाने…

  • आर्या – AARYAA

    हंसगती शुभ आर्या सिंहगती सैनिकी सबल आर्या गजगामिनी सुंदरी सर्पिणी जणू कुरळ आर्या निज आत्म्यात रमाया अक्षरी लीन ब्राम्हीसम आर्या वाग्देवीने अंकित नागीण कृष्ण सरळ आर्या अष्टद्रव्य अर्पिण्यास चालली मानिनी श्यामल आर्या जिनबिंब दर्शनाने अंतरी धन्य सजल आर्या

  • जरतार – JARATAAR

    लुगडं हिरवं हिरवं गार नेसली बयो लुगडं झक्क नऊ वार नेसली बयो स्वच्छ पान घाटदार देह नेटका लुगडं तलम काळंशार नेसली बयो लाल काठ पीत पदर मधुर भाषिणी लुगडं निळं जाळीदार नेसली बयो लेखणीच खड्ग शस्त्र जात भुताची लुगडं नंदू जरतार नेसली बयो लांछनास सुकर वृषभ टिळा चंदनी लुगडं सात अब्ज भार नेसली बयो जीवाला…

  • महास्कंध – MAHA SKANDHA (BATHOLITH)

    स्थूलपणा पुदगल द्रव्याचा चौथा पर्याय सूक्ष्मपणासम ढोबळ त्यातिल प्रकार दो जाण सर्वांमध्ये अधिक स्थूल जो समस्त जगतात जगास व्यापे पूर्ण असा जो तोच महास्कंध आंब्याहुनही स्थूल खरबूज त्याहुन टरबूज टरबूजाहुन स्थूल शोधण्या आपेक्षिक स्थूल महास्कंध अन आपेक्षिक हे विभाग दो जाण स्थूलपणाला जाणायाला उपयोगी फार २५ मात्रा