-
वॉटसप वरचा एक तास – WHAT’S APP VARACHA EK TAAS (an hour on the whats app)
वॉटसप वरचा एक तास – लिहिणारा – बाजीराव दांडगे इयत्ता – चवथी तुकडी – ड काल माय बाजारात मासळी इकाया गेलती. तवा ती तिचा मवाइल इसरून गेलि. मी मंग चान्स घेतलाच. गेलो लगीच वाटसापावरी. तितं मायंदाळ गटबाजी व्हति. एक गट व्हता, म्हायारची मानसं . दुसरा गट व्हता, साळंतली दोस्त मंडळी. तिसरा गट व्हता, सासारचा वाडा.…
-
मोदक – MODAK (sweet dish)
मोदकांस दे आसन सुंदर कारण त्यातिल सारण सुंदर वर्तमान हा अतीव सुंदर भूतच होता कारण सुंदर ग्रंथ समीक्षा ललित कथांची उघडू त्यांचे बासन सुंदर माझे पुस्तक प्रसिद्ध जगती अक्षर अक्षर पावन सुंदर घर सजण्या मम रम्य भूतली वृक्षांचे संभारण सुंदर जागृत चेतन मन वैमानिक नेणिव दैवी साधन सुंदर गझल – मात्रावृत्त (मात्रा १६)
-
साय – SAAY (cream)
-
ध्वजा – DHVAJAA (flag)
ज्योतीने मी ज्योत लावली ज्योत तेवण्या जीवांची ज्योतीने या धरा उजळली प्रीत पेरण्या जीवांची डोळस अंधांना नयदृष्टी देण्यासाठी ज्योत मिटे काळोखाला टिकवुन ठेवे ठेव ठेवण्या जीवांची करी कुंचला शशिकिरणांचा हाती सृष्टीच्याच असे कैवल्याच्या भिजुन चांदणी कला रेखण्या जीवांची मुनीमनासम नीर वाहते नावेमध्ये शीड उभे रत्नत्रय प्राप्तीच्या मार्गी ध्वजा पेलण्या जीवांची ऐक सुनेत्रा दो नयनांचे दो…
-
दर्रारा – (fear and respect)
आधी वावटळ येते धूळ फर्रारा उडाया दिशा दाही नाचतात पीळ भर्रारा सुटाया पीळ सांग सोडवाया चक्रीवादळी पिसाटा ओत पोते भरुन मीठ भूत गर्रारा फिराया धाव धाव धावताती कृष्ण मेघ सैरावैरा कडाडते वीज बाई खरा दर्रारा कळाया अंगांगात भुईच्या ग काटे कुसळांची गर्दी मातीवर लोळ लोळे वात खर्रारा कराया शुभ्र टपोर गारांचा मारा ढगातून होई गात…
-
आम्ही – (we)
टोक गाठुनी आलो आम्ही पारसनाथाचे टोक गाठुनी झालो आम्ही पारसनाथाचे भक्त पातले सम्मेदावर घागर घेवोनी टोक गाठुनी न्हालो आम्ही पारसनाथाचे रंग उधळुनी संधीकाली सूर्यकिरण हसता गंध चंदनी प्यालो आम्ही पारसनाथाचे वस्त्र किरमिजी रंगबिरंगी घेउन मेघांचे टोक गाठुनी ल्यालो आम्ही पारसनाथाचे पायताण पायात नसूनी चढलो भरभर वर टोक गाठुनी आलो आम्ही पारसनाथाचे गझल – अक्षरगण वृत्त…
-
अर्घ्यावली – (offering)
मातीलाही स्मरते गाणे वळीव जेव्हा येतो धो धो वाऱ्यामध्ये तरते गाणे वळीव जेव्हा येतो धो धो उदकचंदनी रेशिमधारा झेलत असता अंगागावर घटात भूमी भरते गाणे वळीव जेव्हा येतो धो धो खडीसाखरेसम गारांची जलदांमधुनी वृष्टी होता मातीसुद्धा वरते गाणे वळीव जेव्हा येतो धो धो तापतापुनी धूप जाळुनी फळाफुलांनी बहरुन येण्या धरा सावळी धरते गाणे वळीव जेव्हा…