Tag: Marathi sahitya

  • फुले – FULE (FLOWERS)

    अता वेळ कोठे दुपारी मला रे नको दावू आता हुशारी मला रे जरी ना कळाली न कोडी न चाली तरी तेच म्हणती जुगारी मला रे फुले तू दिलेली किती भावली ही परी आवडे ती सुपारी मला रे फुले चुंबण्याचा  मला शौक भारी म्हणोनी म्हणावे कुमारी मला रे ‘सुनेत्रा’ शराबी पुरी झिंगली अन कळाली नशेची खुमारी…

  • आठवणीतिल गुलाब – ATHAVANITIL GULAB(ROSES IN THE MEMORY)

    निळ्या पापण्यांवरून फिरती मोरपिसे ही नाजुक लोभस, फुलून येती अन हृदयातिल आठवणीतिल गुलाब राजस! ब्रम्ह-कमळ नी निशिगंधासम दवात भिजली लिली दिवाणी, किती लाघवी कुंद-काकडा, लाजलाजते कण्हेरराणी! धवल गुलाबी गडद किरमिजी ती शेलाटी मधुमालती; नाजुक-साजुक गोकर्णीची अंबाड्यावर माळे फांती… कोण कशाला कुठे निघाले? नका विचारू प्रश्न सारखे; प्रीतसागरी डुंबायाला जसे उतरले जळी पारवे!!

  • खेळ – KHEL(GAME)

    In the summer holidays children play different games like Chendufali (criket), hide and seek etc. After playing in the hot sun children buy Kulfi from Kulfivala. In Marathi the word ‘Garegar’ is used for Kulfi. कोण खेळते चेंडू-फळी अन कोण खेळते पळापळी….. कुणी लंगडी घालत येते- हळूच गुपचूप पाय बदलते; पाठीवरती ‘खो’ घालुनी, बसलेल्याला कुणी…

  • सुंदर माय! – SUNDAR MAAY(BEAUTIFUL MOTHER)

    In this poem poetess meets her beloved mother in the dream. This dream is described in this poem. स्वप्नामध्ये काल भेटली, स्वप्नसखी मज सुंदर माय ! उरी उरी मग भेटुन तिजला , रडलो दोघी  धाय धाय!! तेच प्रेम अन तोच जिव्हाळा , अंतरातुनी फुटे उमाळा … उसळुन आल्या भरतीच्या लाटा!!! मुक्त कराया प्रेमाच्या वाटा…. उठेल…

  • मृद्गंधाचा मस्त धुमारा!!!-MRUDGANDHACHA MAST DHUMARA!!!(SMELL OF WET SOIL)

    घन, घन झाले, अती अती घन कोसळेल मग अता कसे हो अवनीवरती धारांचे घन? शीतल वारा हवा यावया घन मेघांना मृदुल कराया! वाऱ्यासंगे धावतील घन नभात अवघ्या सैरावैरा… नाचत नाचत बरसतील मग पाऊस-धारा आणिक गारा, मृद्गंधाचा मस्त धुमारा!!!

  • मज्जा करूया! – MAJJA KARUYA!(WILL MAKE FUN)

    उन्हाळ्याची सुट्टी आली; मज्जा करूया! सोसायटीच्या पार्किंगमध्ये, चेंडू खेळूया! प्लास्टिकचा हा चेंडू बघा टप्पे घेत नाही, लोखंडाचा चेंडू तर- उडतच नाही. आपला रबरी चेंडू पळे किती- थांबतच नाही. पकडुन आपल्या चेंडूला टप्पाटप्पी खेळू; जास्त टप्पे कोणाचे ते- भराभरा मोजू. कोण जिंकलं? कोण हरलं? वादावादी नको; सुट्टी संपेल भांडा-भांडीत- वाद आता नको. आज जिंकू,उद्या हरू, परवा…

  • गोल गोल वाघोबा – GOL GOL VAGHOBA(TIGER)

    In this story a touching and true friendship between a small girl and boy is described. गोटी आणि टिल्लूचे घर अगदी शेजारी शेजारी होते. आपल्या लाल रंगाच्या तिचाकीवरून टिल्लू अगदी वेगात आला. खिडकीत उभ्या असलेल्या गोटीला पाहून म्हणाला, “गोटे, चल खेळायला.” मी नाही येणार. कट्टी आहेना आपली ? विसरलास वाटतं?” गोटी म्हणाली. टिल्लू मग निघून…